*बल्लारपूर येथे एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या..*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 03/05/2024 2:57 PM

*बल्लारपूर येथे एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या..*

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील विद्या नगर वॉर्ड येथे राहणाऱ्या एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल रात्री ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार विद्या नगर वॉर्ड येथील रहिवासी असलेले राहुल विजयकुमार जैस्वाल वय ४४ वर्ष यांनी आपल्या स्वतःचा घरी स्टोअर रूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असून रात्री त्यांचे भाऊ काही कामासाठी स्टोअर रूम मध्ये गेले असता त्यांना राहुल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी याची माहिती बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे दिली. लागलीच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले. पोलीसांनी मर्ग दाखल केले असून प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनंजय गिन्नलवार, पोहवा विशाल बेझलवार करीत असून या घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या