*महाविकास आघाडी कडून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ - विशाल निंबाळकर*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 25/09/2021 11:07 PM

चंद्रपुर 25 सेप्टेंबर :
  ऐन वेळेवर आरोग्य विभागाच्या गट क व गट ड संवर्गातील परीक्षा रद्द करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ असल्याचे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी म्हटले असून तीन चांकावर चालत असलेली  ही सरकार इतर सर्व क्षेत्रासह नौकर भरती प्रक्रियेतही अक्षरशः फेल झाली असल्याचा घणाघाती आरोप केला आहे.
    25 आणि 26 सप्टेंबरला आरोग्य विभागाच्या गट क व गट ड संवर्गातील परीक्षा होणार होत्या या करिता शुल्क भरत अनेक उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यांनी यासाठी अहोरात्र परिश्रम घेत परिक्षेची तयारी केली होती. त्यानंतर सदर उमेदवाराना हॉल तिकीट व परीक्षा केंद्र देण्यात आले मात्र एन परिक्षेच्या एक दिवसा अगोदर परीक्षा रद्द करण्याचा  निर्णय घेण्यात आला. हा निर्णय म्हणजे महाविकास आघाडीच्या  महाभक्कास कारभाराचे उदाहरण आहे. या तुकलगी निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. तसेच त्यांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे विशाल निंबाळकर यांनी म्हटले असून येत्या काळात विद्याथी अश्या अकार्यक्षम सरकारला धळा शिकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या  महाविकास आघाडीचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या