ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

राष्ट्रवादी बांधकाम कामगार सेलची सांगली जिल्हा आढावा बैठक संपन्न...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 9/26/2021 8:38:41 AM    राष्ट्रवादी कार्यालय सांगली येथे राष्ट्रवादी बांधकाम कामगार सेलची आढावा बैठक राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर-जिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी बोलताना राहुलदादा पवार म्हणाले की, बांधकाम कामगार सेल ही संघटना संपूर्ण सांगली जिल्ह्यात बांधायची असल्याचे सांगितले, तालुकानिहाय अध्यक्ष नेमण्यात बाबत संबंधित पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
यासाठी तालुकानिहाय राष्ट्रवादी अध्यक्षांची मदत घेण्याचा निर्णय झाला. यावेळी अफजल मुजावर यांची राष्ट्रवादी कामगार सेल च्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली तर निवास गायकवाड यांची राष्ट्रवादी कामगार सेलच्या सचिव पदी निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रत्येक तालुक्यातून काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अनेकांनी हजेरी लावली आणि राष्ट्रवादी कामगार सेल मध्ये काम करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे, जिल्हा कार्याध्यक्ष अफजल मुजावर,जिल्हा सचिव निवास गायकवाड,,शहराध्यक्ष राहुल हिरोडगी, शहर उपाध्यक्ष राजू कांबळे, मिरज शहराध्यक्ष अल्लाबक्ष गडकरी,अमित चव्हाण,समीर कुपवाडे, युवक राष्ट्रवादी कुपवाड शहर अध्यक्ष सुनिल भोसले, व जिल्ह्यातून आलेले कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

Share

Other News