ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कोल्हापूरच्या दतात्रय कदम यांच्या सुंदर हस्ताक्षराची स्वःता मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल...!!!


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 9/26/2021 11:27:11 AM


 “सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना” असे म्हंटले जाते 
ते खरेच आहे.
व्यक्तिमत्व घडवण्यात हस्ताक्षराचा मोठा वाटा असतो. असंच काहीसं घडलं  कोल्हापूरचे  श्री. दत्तात्रय कदम ह्यांच्या बाबतीत. 
    दत्तात्रय बाबुराव कदम कोल्हापुरातील मु.मडुर पैकी कासारवाडी ग्रामीण भागातला. दिवसरात्र अभ्यास करून २०१७ ला स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन मंत्रालयातील गृहनिर्माण विभागात लिपिक म्हणून नोकरीला लागला. आई वडिलांच्या कष्टाचं चीज झालं. मुळात ग्रामीण भागातून असलेला दत्ता कामाच्या बाबतीत अतिशय काटेकोर.             
      मंत्रालयात वर्षानुवर्षे असंख्य फाईली पडलेल्या असतात. मुळात अश्या असंख्य फाईल मुख्यमंत्र्यांसमोर येत जात असतात. पण गृह निर्माण विभागाची फाईल विशेष होती. त्याचं कारण त्या फाईलवरच सुंदर हस्ताक्षर. ती फाईल मुख्यमंत्र्यांनी हातात घेऊन संबंधित सचिवांना हस्ताक्षर कुणाच आहे हे विचारलं व भेटीची इच्छा व्यक्त केली आणि भेटले. 
    माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ह्यांनी दत्तात्रय कदम ह्यांना भेटून त्यांच्या वळणदार अक्षराचे भरभरून कौतुक केलेच शिवाय ही कला जोपासण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. सध्याच्या टायपिंगच्या जमान्यात सुंदर हस्ताक्षर लोप पावत चालले आहे. अशा वेळी दत्ताला सुंदर हस्ताक्षरसोबतच आवर्जून लिखाणासाठी वेळ काढून कॅलिग्राफी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले.
      आज अनेक लोक ह्याच्या त्याच्या ओळखीने मंत्र्यांसोबत फोटो काढून मिरवतात  दत्ताला सुंदर हस्ताक्षरामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांनी भेटीला आमंत्रण दिले.

Share

Other News