रोहित बोंबार्डे
प्रतिनिधी तुमसर :--- जनसामान्य लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजु कारेमोरे यांनी तुमसर तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावा गावात जाऊन जनसंपर्क व आढावा बैठक घेतली बैठकीला परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवीत आपल्या समस्या आमदारापुढे मांडल्या.
या प्रसंगी आष्टी जि. प. क्षेत्रात येणाऱ्या आष्टी, लोभी, नाकाडोंगरी, पाथरी, पवनारखारी, कवलेवाडा, गणेशपुर व चांदमारा येथील जनते द्वारे आमदार राजु कारेमोरे यांचे शेतकऱ्यांना धानाला बोनस मिळवुन दील्याबदल जन सत्कार करण्यात आले दरम्यान आढावा बैठकीत नागरिकांच्या शेती, विद्युत, पाणी, रोड, जमीन, महसुल, शिक्षण व आरोग्य विषयक अनेक सार्वजनिक व व्यक्तीगत ईतर विवीध प्रश्न व समस्या आमदार साहेबांपुढे जनतेने मांडल्या त्याक्षणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित माहीती मागवून आमदार साहेबांकडून प्रश्नांना मार्गी लावु असी ग्वाही दिली जनतेच्या समस्या लवकरात लवकर सोडवु असे आश्वासन दिले यावेळी आमदार कारेमोरे यांच्या सोबत ठाकचंद मुंगुसमारे अध्यक्ष रा.यु.काँ तालुका, शिशुपाल गौपाले मा. उपसभापती पं. स. तुमसर., डॉ. सुनिल चौळे , राजु देशभ्रतार सरपंच ग्रा.पं.लोभी, शेषराव देशमुख पोलीस पाटील, तेजराम देशमुख अध्यक्ष तं. मु. समीती, ज्योती गेडाम सरपंच ग्रा.पं.आष्टी, अनिल गौपाले उपसरपंच, प्रकाश गौपाले, गोल्डी घडले उपसरपंच ग्रा. पं. नाकाडोंगरी, डॉ. सचिन बावनकर जिल्हाध्यक्ष डॉ. सेल, शालीक गौपाले, कैलास परतेती सरपंच ग्रा.पं. पाथरी, रतिराम खुने मा. सरपंच, खुशाल पुष्पतोडे, गौरव नांदगाये, दिलीप वाघाडे उपसरपंच, निशा बिसने सरपंच ग्रा.पं कवलेवाडा, धनेश बोरकर मा. सरपंच, प्रेम वरकडे, अवि राऊत, रुपेश बोरकर, सागर मुंगुसमारे, मुन्निबाई देशमुख सरपंच ग्रा.पं पवनारखारी, हरीप्रसाद वाढिवे उपसरपंच, मनोज सुहागपुरे, संतोष वाढिवे मा. उपसरपंच, ममता ऊके, आकाश झोडे भागवत शेंडे, सर्व ग्रा. पं. सदस्य, गावातील आजी माजी पदाधिकारी, शासकीय अधीकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.