*वणी राजुर इथे “भारत बंद”ला उत्फुर्स प्रतिसाद*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 27/09/2021 10:19 PM





वणी राजुर 27 सप्टेंबर :-  संयुक्त किसान मोर्चाने आपल्या राष्ट्रीय संमेलनात, मोदी सरकारच्या जनविरोधी, कॉर्पोरेटधार्जिण्या व भारतीय संविधानिक मूल्यांशी विसंगत असलेल्या धोरणांविरुद्ध आज 27 सप्टेंबरला ‘भारत बंद’ ची हाक दिली होती.राजुर शहरात  व्यापारी वर्गानी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवल्याने या आंदोलनास उत्फुर्स प्रतिसाद मिळाला.यावेळी या आंदोलनास सर्व राजकीय पक्षासह विविध सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविला.

मोदी सरकारने शेतकरी विरोधी धोरणे लादून जणूकाही हुकूमशाही सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या जनविरोधी,कार्पोरेट धार्जिन,व भारतीय संविधानिक मूल्यांशी विसंगत असलेल्या धोरणाविरुद्ध  5 सप्टेंबरला उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगरला झालेल्या 10 लाखांच्या अभूतपूर्व किसान मजदूर महापंचायतीने या हाकेस बुलंद समर्थन दिले आहे.देशभरातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार, कर्मचारी, शेतमजूर, महिला, युवा, विद्यार्थी व इतर संघटनांनी या ‘भारत बंद’ ला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे.
वणी राजुर शहरातील छोट्या मोठ्या व्यापारांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून भारत बंद आंदोलनास आपला पाठींबा दर्शविला.

Share

Other News

ताज्या बातम्या