ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

पोलीस मदत केंद्र गट्टा-फु येथे भव्य जनजागरण मेळावा संपन्न


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 10/27/2021 8:27:45 AM


  प्रतिनिधी : प्रशांत पेद्दापल्लीवर
       
  गट्टा-फु:- मौजा गट्टा फु. येथील पोलिस मदत केंद्राच्या पटांगणावर  गडचिरोली पोलिस दल व पोमके गट्टा फु. यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस दादालोरा खिडकी योजनेअंतर्गत भव्य जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला होता.
सदर मेळाव्याला पोमके गट्टा फु. हद्दीतील २५० ते ३०० नागरिक उपस्थित होते .सदर कार्यक्रमास अध्यक्ष श्रीमती विमल उसेंडी, सरपंच मौजा गट्टा, कार्यक्रमाचे उद्घाटक  बलगुजर, (प्राचार्य आश्रमशाळा गट्टा) प्रमुख पाहुणे,  मोहुर्ले, (कृषी अधिकारी धानोरा),  बारापात्रे ग्राम विकास अधिकारी चिचोडा ढवले तलाठी गट्टा. झुंगा पाटील उसेंडी,गाव पाटील गट्टा,  हरिदास हीचामी गाव पाटील हरंडा,  मोतीराम उसेंडी, गाव पाटील मुरगाव,. मोतीराम तुमरेटी, गाव पाटील सिनसूर, मनकु नरोटे गाव पाटील गोटा,  सोनू पदा, केशरी उसेंडी,  दूधबावरे मॅडम व  किनाके मॅडम प्राथमिक आरोग्य केंद्र गट्टा सदर  कार्यक्रमास उपस्थित होते.
कृषी अधिकारी मोहुर्ले  यांनी कृषी विभागामार्फत आदिवासी भागात राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना माहिती दिली. तसेच पोलीस मदत केंद्र गट्टा यांच्याकडून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत पाठविण्यात आलेले प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून लाभ देण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रभारी अधिकारी, गट्टा फु. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वाघ सा. व पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे यांनी उपस्थित नागरिकांना गडचिरोली पोलीस दला मार्फत पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच  अरविंद ढवळे, तलाठी गट्टा यांनी नागरिकांना विविध योजनांची माहिती देऊन २७ सातबारा उतारा वाटप केले .
तसेच दि. २५अक्टोम्बर ला जिल्हा परिषद शाळा गट्टा येथे पोलिस शहीद स्मृती दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती सदर स्पर्धेत ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना आज रोजी रोख  पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
सदर मेळाव्या दरम्यान पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत खालीलप्रमाणे कामे करण्यात आली.

१)    १३० शेतकऱ्यांना जवस,    
        लाखोळी, करडईचे असे एकूण 
        ५ क्विंटल ६५ किलो बियाणे
         वाटप केले.

२)      ११९ जॉब कार्ड वाटप .
          करण्यात आले.

३)      १६ पॅन कार्ड करीता नोंदणी  
          करण्यात आली.

४)      २४ आयुष्यमान भारत कार्ड 
          नोंदणी करण्यात आली.

५)       पंतप्रधान सुरक्षा विमा  
          योजना-३१

६)      वृद्धापकाळ योजना- ४

७)      पंतप्रधान किसान सन्मान  
          योजना-१४ फॉर्म भरण्यात    
          आले. 

८)      जात प्रमाणपत्र       
          काढण्याकरिता ४ नागरिकांचे 
          कागदपत्र जमा करून घेण्यात
          आले .

९)      नागरिकांना २७ सातबारा
          उतारा वाटप करण्यात आले

१०)    आरोग्य विभागामार्फत ११ 
           नागरिकांना कोरोणा ची लस
           देण्यात आली.

तसेच पोलीस मदत केंद्र गट्टा तर्फे उपस्थित विधवा व वृद्ध महिलांना २५ साडी/लुगडे वाटप करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक  पेन वाटप करण्यात आली.तसेच शेतकऱ्यांना घमेले वाटप करण्यात आले.उपस्थित सर्व ग्रामस्थांना जेवणाची सोय करण्यात आली होती.

Share

Other News