पिपरे यांच्या पेट्रोल पंपातून निघालेला पाणी होता की इथेनॉल...

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 17/01/2022 1:43 PM


गडचिरोली शहरात आयटीआय चौकात नव्यानेच सुरू झालेला नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्या मालकीच्या एचपी पेट्रोल पंप मधून पेट्रोल ऐवजी पाणीच निघत असल्याची घटना घडली.
पेट्रोल पंप मधून पाणी निघत असल्याची वीडियो काही जागरूक नागरिकांनी सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात वायरल केल्याने गडचिरोली शहरात खळबळ उडाली होती. शहरातील नागरिकांनी पेट्रोल भरवून घेतांना पाणी निघाल्याने या पेट्रोल पंपावर लोकांनी मोठी गर्दीच केली होती.गर्दीत जमलेल्या काही लोकांनी पत्रकारांना माहिती पूर्विल्याने काही पत्रकार सुध्दा सत्यता पडताळून पाहण्यासाठी पेट्रोल पंपावर आले असता,नगरसेवक प्रमोद पिपरे यांचा मुलगा अनुराग पिपरे याने पत्रकारांसोबत धक्कामुक्की करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती गर्दीत जमलेल्या लोकांनी दिलेली आहे.सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक, व गडचिरोली शहरातील पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली होती.
पेट्रोल पंप मधून पाणी निघत असल्याची माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केले असता,पेट्रोल मध्ये निघालेला हा पदार्थ पाणी नसून इथेनॉल असण्याची दाट शक्यता असल्याची माहिती पेट्रोल पंप मालक नगरसेवक प्रमोद पिपरे यांनी सांगितली आहे. महाराष्ट्र माझा न्यूज चे संपादक कैलाश शर्मा यांनी पेट्रोल मध्ये निघालेला पाणी आहे की इथेनॉल हे जाणून घेण्यासाठी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे विक्री अधिकारी उमेश रॉय यांच्या मोबाईल वर संपर्क करून जाणून घेतली असता, त्यांनी पेट्रोल पंप मधून पदार्थ पाणी आहे की इथेनॉल आहे हे तपासून पाहण्यात येणार आणि तो पर्यंत साद्या पेट्रोल ची विक्री बंद करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे.लोकांनी  दिलेल्या माहितीवरून जिल्हा प्रशासन,आणि पोलिस ठाण्यातर्फे काय कारवाई करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या