भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आंमत्रित

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 18/01/2022 8:18 PM



गडचिरोली,(जिमाका)दि.18: अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता , इतर आवश्यक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करण्यासाठी दि.13 जून 2018 च्या सुधारित शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना 10वी/12वी/पदवी/पदवीका परिक्षेमध्ये 50% पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सन 2020-21 व 2021-22 या शैक्षणिक सत्राकरीता विद्यार्थ्यांनी दि.28 फेब्रुवारी 2022 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचेकडे अर्ज सादर करण्यात यावे.निकष, अटी व शर्ती तसेच अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, गडचिरोली यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या