भाजप प्रदेश सदस्य शेखर इनामदार दुहेरी जबाबदारी पार पाडत सकाळी सांगलीत तर संध्याकाळी गोव्यात...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 19/01/2022 9:16 AM



     गोव्यामध्ये सांताक्रूझ  मतदार संघाचे प्रभारी म्हणून  शेखर ईनामदार साहेब  काम पाहत आहेत.  तेथील  महत्त्वाची जवाबदारी असतानाही कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव सांगली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 चे पोट निवडणूक साठी  येऊन गेली पाच ते सहा दिवस सांगलीत  तळ ठोकुन  भारतीय जनता पार्टी च्या निवडणुकीच्या प्रचाराला गती  दिली . तसेच भाजप कार्यकर्त्यांच्या मध्ये मोठा उत्साह निर्माण केला.  आज मतदान दिवशी सर्व यंत्रणा सुरळीत लावून दुपारी गोव्याच्या  निवडणुकी साठी रवाना झाले .व गोव्यात पोहोचुन विश्रांती न घेता लगेचच डायरेक्ट गोवा निवडणुकींच्या कामात झोकून देऊन  सलग बैठका घेतल्या. भारतीय जनता पार्टीने दिलेली जबाबदारी अतिशय चोखपणे बजावणारे शेखरजी ईनामदार हे  नेते आहेत. शेखर इनामदार साहेब यांच्या सारखे  नेते भारतीय जनता पार्टीत आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे भवितव्य हे नक्कीच आणखीच  उज्वल असणार याबाबत कोणतीही शंका नाही......

Share

Other News

ताज्या बातम्या