जिल्हयातील 9 नगरपंचायतींची मतमोजणी उद्या

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 19/01/2022 5:54 PM



गडचिरोली,(जिमाका)दि.19: जिल्हयातील भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, कोरची, अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा व कुरखेडा या 9 नगरपंचायती मध्ये मतदान प्रक्रिया पार पडली असून, मतमोजणी उद्या दिनांक 20 जानेवारी रोजी सकाळी 10.00  वाजेपासून  सुरु होणार असून मतमोजणीची  टेबल व फेऱ्या पुढील प्रमाणे - 
भामरागड 3 टेबल 6 फेऱ्या, 
अहेरी 4 टेबल 5 फेऱ्या, 
सिरोंचा 4 टेबल 4 फेऱ्या शेवटीचा फेरीसाठी 1 टेबल
कुरखेडा 4 टेबल 5 फेऱ्या
एटापल्ली 4 टेबल 4 फेऱ्या, 
धानोरा 6 टेबल 3 फेऱ्या, 
मुलचेरा 6 टेबल 3 फेऱ्या, 
चामोर्शी 4 टेबल 5 फेऱ्या
कोरची 3 टेबल 6 फेऱ्या
अशा प्रकारे मतमोजणी राहणार आहे.अशी माहिती नगरप्रशासन विभागाने दिली.

Share

Other News

ताज्या बातम्या