जिल्ह्यातील शासकीय तसेच खाजगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची सांखिकी माहिती भरणे बाबत

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 19/01/2022 6:44 PM



 

गडचिरोली,(जिमाका)दि.19:जिल्हयातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय,निमशासकीय, तसेच कलम 55 (2) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायघ्यांतर्गत असणा-या आस्थापणांना त्यांच्या आस्थापनेवर असणा-या सर्व कर्मचा-यांची पुरुष,स्त्रि व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस विषयांकीत कायद्यातील तरतूदीच्या विहीत नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in.या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राअंतर्गत केले आहे.माहे ऑक्टोंबर-डिसेंबर-2021 अखेर या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,शासकीय संकूल बॅरेक क्रमांक-2 युनिट क्रमांक-2,कॉम्प्लेक्स,गडचिरोली 442605 या कार्यालयाव्दारे चालू आहे. या सर्व आस्थापनांकडून 100 टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे.या सर्व आस्थापनांना या कार्यालयाकडून यापूर्वीचे युझर आयडी व पासवर्ड देण्यांत आलेला आहे.त्याचा वापर करुन प्रत्येक आस्थापनाने या विभागाच्या संकेतस्थळावर लॉगीन करावा व आपली अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी.या संदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास [email protected] या ईमेल आयडीवर अद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व आवश्यक तपशिलासह संपर्क साधल्यास या कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यांत येईल.

Share

Other News

ताज्या बातम्या