अवैध गांजा शेतीवर एलसीबी व म्हसवड पोलिसांची संयुक्त कारवाई करून 7 लाख 81 हजार 750 रुपये किमतीचा गांजा जप्त

  • अतुल पवार (गुरसाळे)
  • Upadted: 05/07/2020 10:21 PM

अवैद्य गांजा शेतीवर एलसीबी व मसवड पोलिसांची संयुक्त कारवाई करून 7 लाख 81 हजार 750 रुपये चा गांजा जप्त दिनांक 4 7 2020 रोजी श्री सर्जेराव पाटील स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना त्यांच्या गोपनीय बातमीदार मार्फत माहिती प्राप्त झाली की बनगरवाडी तालुका मान जिल्हा सातारा गावच्या हद्दीत शिंगाड्याच्या शेत नावाचे शिवारामध्ये एक इसम त्याच्या शेतामध्ये गांजा या अमली पदार्थाचा झाडांची लागवड करून जोपासना करीत आहे त्याबाबत त्यांनी श्रीमती तेजस्विनी सातपुते पोलीस अधीक्षक सातारा धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक सातारा यांना माहिती कळविली त्या इसमावर कारवाई करण्याचे आदेश श्रीमती तेजस्विनी सातपुते पोलीस अधीक्षक सातारा यांनी दिल्यानंतर श्री सर्जेराव पाटील पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा सातारा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे पथकासह म्हसवड येथे जाऊन श्री बाबुराव महामुनी उपविभागीय पोलिस अधिकारी व गणेश वाघमोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हसवड पोलीस ठाणे यांना बातमीचा विषय सांगून श्री बाबुराव महामुनी उपविभागीय पोलिस अधिकारी दहिवडी विभाग यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक व म्हसवड पोलीस ठाणे कडील पथक तसेच तहसीलदार दहिवडी श्रीमती बाई माने मॅडम यांनी मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तीन इसम शेतामध्ये गांजाच्या झाडांची पाने तोडत असताना मिळून आलेने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरची गांजाची झाडे विक्री करण्यासाठी लागवड केली असल्याची माहिती दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जात 7 लाख 81 हजार 750 रुपये किमतीचा गांजा मिळून आल्याने बजरंग शिंगाडे वय 65 भोलेनाथ शिंगाडे वय 40 गणेश शिंगाडे वय 35 यांच्या विरोधात म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Share

Other News

ताज्या बातम्या