भाजपा जिल्हाध्यक्ष दिपक बाबा शिंदे - म्हैशाळकर यांची हिन्दुस्तान एरोनॉटिक्सच्या मिंटीगला उपस्थीती , हेलीकॉप्टर विभागाला दिली भेट...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/05/2022 11:53 AM

 
     हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड पदी निवड झालेले सांगली जिल्ह्याचे सुपुत्र भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष सन्माननीय दीपक बाबा शिंदे म्हैशाळकर यांनी पहिल्या डायरेक्टर मिटींगसाठी उपस्थित राहून हेलिकॉप्टर विभागाला भेट दिली . 
    खरंतर आज सांगलीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या सांगलीतील अतिशय उच्चशिक्षित व आपल्या राजकीय व सामाजिक कामाने समोरच्या व्यक्तिला आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व दीपकबाबा आज इतक्या मोठय़ा पदावर पोचलेले आहेत . दीपक बाबा शिंदे म्हैशाळकर यांनी सांगली शहरातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाचे काम ,बांधणी व पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देत अनेक माझ्यासारख्या नवख्या तरुणांना राजकारणात काम करण्याची संधी दिली . सर्वसामान्यांमधील लोकांचे काम राजकीय असो वा सामाजिक बाबा त्या कामाला तितक्याच नम्रतेने व जिव्हाळ्याने पूर्ण करतात . 
    आपल्या राजकीय जीवनामध्ये पक्षाशी एकनिष्ठ राहून कोणताही दिखाऊपणा व शक्तिप्रदर्शन न करता अतिशय संयमाने भारतीय जनता पार्टीचे काम अतिशय प्रामाणिकपणे करणार्या जिल्हाध्यक्षांना भारतीय जनता पक्षाने इतक्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली याचा नक्कीच अभिमान वाटतो .
    भारतीय जनता पार्टी हि नेहमीच "Party with difference " म्हणून ओळखली जाते व त्याचे उत्तम उदाहरण आज दीपक बाबा शिंदे म्हैशाळकर सरकार यांच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्रासमोर आहे . 

   पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे हार्दिक आभार व भारतीय जनता पार्टीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे म्हैशाळकर यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...

Share

Other News

ताज्या बातम्या