भारतीय माहिती अधिकार न्यूज नेटवर्कचे जिल्हा संपर्क प्रमुख मल्लीक बुधवानी यांची न्यायालयातून निर्दोष मुक्तता ... !

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 20/05/2022 4:58 PM


------------------------------------------
 *वाहतूक पोलीसांनी दुचाकी चालकावर केलेल्या कारवाईचे प्रकरण*
---------------------------------------

 *शासकीय कामात अडथळा आल्याचा ठपका ठेऊन केलेली कारवाई ठरवली अयोग्य*
---------------------------------------------
गडचिरोली वाहतूक पोलीसांनी  वर्षभरापुर्वी एका दुचाकी चालकावर नियमबाहयरित्या वाहन चालवित असल्याच्या कारणावरून केलेल्या कारवाईत मल्लीक बुधवानी यांनी शासकीय कामकाजात अडथळा आणल्याच्या कारणावरून बुुधवानी यांच्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर  पोलीसांनी या प्रकरणाबाबत न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.  या प्रकरणाचा निकाल लागला असून जिल्हा सत्र  न्यायालयाने बुधवानी यांच्या बाजूने निकाल देत गडचिरोली पोलीसांनी केलेल्या कारवाईवर ताशेरे ओढत पोलीसांना  चपराक दिली आहे. 

प्राप्त माहितीनुसार  १४ जुन २०२० रोजी  सकाळच्या सुमारास गडचिरोली शहरातील आयटीआय चौकात  महिला वाहतूक पोलीस शिपाई प्रतिमा मोहन खरगीया या कर्तव्यावर होत्या.  दरम्यान  एम.एच.३३ डी ६१०६ या दुचाकीला थांबवून चालकाकडन दुचाकी परवाना  तसेच इतर दस्तावेजाबाबत विचारणा केली. परंतू त्याच्याकडे  वाहनाचे कोणतेही दस्तावेज नसल्याने महिला वाहतूक पोलीस शिपाई खरगीया यांनी वाहन इ-  चालान केले. दरम्यान  सामाजिक कार्यकर्ते मल्लीक बुधवानी काही अंतरावर आपले चारचाकी वाहन थांबवून गोरगरीबांवर कारवाई का करता असा प्रश्न उपस्थित करून महिला शिपायाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.  परंतू काही साध्य झाले नाही. तेव्हा प्रतिमा खरगिया वाहतूक पोलीस कर्मचारी हिने  बुधवानी यांच्यावर शासकीय कामात अडथळा  व पोलीसांशी हुज्जत घातल्याच्या कारणावरून गडचिरोली पोलीस ठाण्यात कलम ३५३ व कलम ५०६  अन्वये गुन्हा दाखल केला.  त्यानंतर  या प्रकरणाबाबत जिल्हा व  सत्र न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले.

 हे प्रकरण  अतिरिक्त सत्र न्यायाधिश डी.जी. कांबळे यांच्या न्यायालयात पोहचले. या प्रकरणावर ३० डिसेंबर २०२१  रोजी सुनावनी झाली.  न्यायालयात पोलीस विभागाकडून योग्य ते  साक्ष व सबळ पुरावे सादर करण्यात न आल्याने  अतिरिक्त सत्र न्यायाधिश कांबळे यांनी  मलिक बुधवानी यांच्या बाजुने निकाल देत  पोलीसांनी  केलेल्या कारवाईबाबात ताशेरे ओढले. सरकारी पक्षाच्या वतीने शासकीय अभियोक्ता अॅड. एन.एम.भांडेकर यांनी काम पाहिले तर बुधवानी यांच्या वतीने अॅड.  पी.सी. समजदार यांनी बाजू मांडली.
------------------------------------

 *****   एका जुन्या प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी मल्लीक बुधवानी यांना प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न !
------------------------------------------
दुचाकी चालान  प्रकरणात  मल्लीक बुधवांनी यांना नाहक गोवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे  न्यायालयाच्या निकालावरून  स्पष्ट झाले आहे. मल्लीक बुधवानी यांचा  कोटगल मार्गावरील एमआयडीसी मध्ये सिमेंट विटा निर्मितीचा उद्योग आहे. या कामावरील एका महिला मजूराचा एका पोलीस  शिपायाने विनयभंग केल्याचे प्रकरण १५  जुलै २०१९  रोजी घडले. आरोपी हा पोलीस विभागात कार्यरत असल्याने सुरवातीला हे प्रकरण दडपण्यात प्रयत्न करण्यात आला. मात्र या घटनेबाबत सबंधीत महिलेने मल्लीक बुधवानी यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून दोषी पोलीस शिपायावर कठोर कारवाई करण्याची मागणी तत्कालीन पोलीस निरिक्षक प्रदिप चौगावकर यांच्याकडे केली होती. सदर   प्रकरण एका  महिलेवरील अत्याचाराचे  असल्याने  आरोपीवर  कारवाई झाली  पाहिजे  यासाठी बुधवानी  यांनी जोर  लावून  धरले  होते.   या प्रकरणाचा रोष बुधवानी यांच्यावर होता.  बुधवानी यांनी लावून धरलेल्या मजूर महिला विनयभंग प्रकरणाचा धागा दुचाकी वाहनचालन प्रकरणाशी जुुळल्या असल्याचे न्यायालयाच्या लक्षात आले.
मल्लीक बुधवानी यांना दुचाकी इ-  चालन प्रकरणात नाहक गोवून शासकीय कामात अडथळा आल्याचा  ठपका ठेऊन सुडबुध्दीने कारवाई करण्यात आल्याचे बुधवानी यांच्या वकीलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.  बुधवानी यांचे वकील  पी.सी. समजदार यांनी बुधवानी यांच्या वतीने न्यायालयात जोरदार बाजू मांडल्याने व सरकारी पक्षाकडून योग्य ती साक्ष व सबळ पुरावे सादर होऊन  न शकल्याने जिल्हा न्यायालयाने बुधवानी यांच्यावर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशिर ठरवित  बुधवानी यांना दिलासा दिला आहे. 

*प्रतिमा खरगिया ही मागील 4 वर्षांपासून वाहतूक विभागात कार्यरत असून हिने आज पर्यंत वाहतूक विभागात कार्यरत असतांना 4 पैकी एका नागरिकावर विनयभंग, व नागरिकांवर  शासकीय कामात अळथला आणल्याचा खोटा गुन्हा दाखल केला असून न्यायालयातुन त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे. तरी वाहतूक पोलीस कर्मचारी प्रतिमा खरगिया ही अजूनही वाहतूक विभागात कार्यरत आहे. पुन्हा असे प्रकार घडू नये म्हणून तिची बदली करण्यात यावी अशी मागणी मलिक बुधवांनी यांनी केली आहे. 

*"मला न्यायालयावर पूर्ण विश्वास होता. न्यायालयाने दिलेला निकाल मला मान्य आहे*
                    मलिक बुधवानी

Share

Other News

ताज्या बातम्या