ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

अनुसूचित जामातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 5/20/2022 7:57:10 PM


गडचिरोली,(जिमाका)दि.20: महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास विभागाकडुन राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणेसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. 
     योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न कमला मर्यादा रु.6.00 लाख आहे. योजनेचा इतर सर्वसाधारण अटी व माहिती साठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली येथे संपर्क साधावा. इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दिनांक 5 जून 2022 पर्यंत अर्ज प्रकल्प  कार्यालय,गडचिरोली  येथे सादर करावे.सदर योजनेसाठी अर्ज प्रकल्प कार्यालय,गडचिरोली येथे विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे असे सहा.प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांनी कळविले.     
*****

Share

Other News