ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*पहिल्याच पावसात पुलाची दुर्दश्या पेंढरी,, मुंगनेर, धानोरा मार्गावरील प्रकार,दर्जाबाबत प्रश्नचिन्ह*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 7/1/2022 9:15:48 AM

धानोरा                   

         लाखो रुपयांचा खर्च करुनही अवध्या  चार महिण्यातच पुल खचल्याने धानोरा तालुक्यातील पेंढरी,मुंगनेर,चव्हेला या मार्गावरील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतुन निर्माण करण्यात आलेल्या डांबरीकरन व पुल बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.             
          चार महिन्यापुर्वी धानोरा तालुक्यातील पेंढरी,मुंगनेर,चव्हेला  या मार्गावर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत डांबरीकरण व पुलांचे बांधकाम करण्यात आले. या मार्गावरील वाहतुक सुरळीत झाली होती. मात्र चार दिवसापूर्वी आलेल्या पावसामुळे या मार्गावरील चिमरीकल गावाजवळचा पुलखचला व डांबरीकरणाला जागोजागी भेगा अन खड्डे पडलेले आहेत,,,या मुळे या संपूर्ण बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह ऊभे ठाकले आहे..

Share

Other News