परंडा शिक्षण कार्यालयाचा भोंगळ कारभार रात्रीस खेळ चाले, एकाच वेळी एक व्यक्ती दोन ठिकाणी

  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 26/11/2022 11:05 AM


परंडा शिक्षण कार्यालयाचा भोंगळ कारभार
 रात्रीस खेळ चाले, एकाच वेळी एक व्यक्ती दोन ठिकाणी
हा खेळ चालू होता भैरवनाथ माध्यमिक विद्यालय कंडारी येथे  
परंतु अन्याय ग्रस्त 
सुधीर माधव ठवरे  कर्मचारी भैरवनाथ माध्यमिक विद्यालय कंडारी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद शैक्षणिक वर्ष 2013 ची शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असून त्यांची याचिका सध्या उच्च न्यालयालय खंडपीठ औरंगाबाद येथे न्यायप्रविष्ठ आहे सन 2015 पासून ते भैरवनाथ विद्यालय कंडारी या शाळेतील गैरकारभाराबाबत व शाळेमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये केलेल्या घोटाळ्यासंदर्भात सतत पाठपुरावा करत होते 
त्यांच्या पाठपुराव्याला दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी यश मिळाले आहे 
(सविस्तर माहिती):- शैक्षणिक वर्ष 2013 14 मध्ये श्री देशमुख समाधान विक्रम हे बीएड प्रशिक्षणार्थी म्हणून राजीव गांधी अध्यापक महाविद्यालय चिंचोली तालुका भूम येथे प्रशिक्षण पूर्ण करत होते
 त्याच कालावधीमध्ये मुख्याध्यापक श्री सुनील पडघन भैरवनाथ माध्यमिक विद्यालय कंडारी  यांनी देशमुख यांचे बनावट रेकॉर्ड तयार करून शाळेमध्ये हजर नसताना शिक्षणाधिकारी माध्यमिक जि प उस्मानाबाद यांच्याकडे वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव पाठवला होता
 त्या प्रस्तावाला तत्कालीन शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांनी वैयक्तिक मान्यता दिली वास्तविक पाहता बनावट बोगस शिक्षक श्री देशमुख हे शाळेमध्येच नव्हते परंतु मुख्याध्यापकाचे भाचे असल्यामुळे त्यांनी त्याचे रेकॉर्ड करून बोगस मान्यता मिळवली होती
 एकच व्यक्ती एकाच वेळी दोन्ही ठिकाणी एकाच वर्षात कसा उपस्थित असू शकतो 
 या शाळेमध्ये श्री देशमुख एस व्ही (सहशिक्षक) व श्रीमती चोबे रेश्मा ओमप्रकाश हे दोन्हीही शिक्षक महाराष्ट्र शासन निर्णय 13 फेब्रुवारी 2013 रोजी च्या निर्णयानुसार टी ई टी पात्र असणं आवश्यक आहे परंतु या शाळेतील हे शिक्षक टीईटी पात्र नाहीत

 उपसंचालक लातूर विभाग लातूर यांनी श्री देशमुख यांची वैयक्तिक मान्यता रद्द केलेली आहे 
तसेच आपल्या जिल्ह्यामध्ये असे अनेक शिक्षक आहेत की जे शासनाची फसवणूक करून शाळेमध्ये कार्यरत आहेत.
 परंतु अशा शिक्षकांवरती कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही याचे कारण आणखी कोणत्याही अधिकार्यांना कळाले नाही असेच दिसत आहे

Share

Other News

ताज्या बातम्या