पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महा पशुधन एक्स्पो 2023 पुस्तकाचे विमोचन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 20/03/2023 7:42 PM

नांदेड :- शिर्डी येथे पशुसंवर्धन विभागाच्यावतीने राज्याचे महसुल, दुग्ध व्यवसाय विकास, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात देशातील सर्वात मोठा महापशुधन एक्स्पो-2023 दिनांक 24 ते 26 मार्च रोजी आयोजित केला आहे. या महापशुधन एक्स्पो 2023 च्या पुस्तकाचे विमोचन नुकतेच डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन सभागृह येथे  राज्याचे ग्रामविकास, पंचायतीराज, वैद्यकिय शिक्षण,  क्रीडा व युवक कल्याण  मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार आमदार बालाजी कल्याणकर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे , जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. रत्नपारखी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बोधनकर डॉ. अरविंद गायकवाड यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या