देवळाली कॅम्प पूज्य सिंधी पंचायत कर्यकरणी जाहीर, अध्यक्षपदी रतन चावला .

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 21/03/2023 9:36 PM

देवळाली कॅम्प पूज्य सिंधी पंचायत  कर्यकरणी जाहीर, अध्यक्षपदी रतन चावला .
प्रतिनीधी l देवळाली कॅम्प  : पूज्य सिंधी पंचायत देवळाली कॅम्प ची २०२३ ते २०२८ ही पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. या निवडणुकीचे मुख्य निवडणूक अधिकारी  बाबू उद्धवदास क्रिष्णानी यांचेसोबत निवडणूक अधिकारी म्हणून कन्हैयालाल लुल्ला व ईश्वर धामेजा यांनी कामकाज पाहिले. 
निवडणूक अधिकारी यांनी सर्वसाधारण सभेत नवनिर्वाचित पंधरा सदस्यांच्या नावाची घोषणा करत रतन राजलदास चावला यांची सलग तिसर्यांदा बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले असे जाहीर केले. 
यावेळी सर्वसाधारण सभेत पूज्य सिंधी पंचायत देवळाली कॅम्प ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.  रतन चावला – अध्यक्ष, हिरो रिजवाणी – उपाध्यक्ष, अमित रोहीरा – जनरल सेक्रेटरी,   कन्हैयालाल आहुजा – सेक्रेटरी, सुनील चावला – ट्रेझरर, नरेश कुकरेजा – स्टोअरकीपर, मनोहरलाल माखीजा – असिस्ट.  स्टोअरकीपर आणि सदस्य म्हणून मनोहर क्रिष्णानी, जयराम चावला, विजय कुकरेजा, टिकम केवलानी, देवा सचदेव, तीरथ गालांनी, राजू नागदेव, नवीन केवलानी यांची निवड करण्यात आली. 
वरील सर्व नवनिर्वाचित सदस्यांची निवडणूक अधिकारी यांचेकडून स्वागत करण्यात आले व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तिन्ही  निवडणूक अधिकारी  यांना कार्यकारणी तर्फे धन्यवाद देण्यात आले. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निर्विवाद व शांततेत झाल्याबद्दल संपूर्ण सिन्धी समाजाने आभार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात रतनजी चावला यानी येत्या पाच वर्षात प्रामुख्याने  पूज्य सिंधी पंचायत देवळाली कॅम्प साठी नवीन आकर्षक इमारत उभारने व समाजातून दोन ते तीन IAS/IPS/IRS  किंवा उच्च पदी अधिकारी बनविन्यासाठी पूर्ण मदत करने या  दोन विषयांवर जास्त काम   केले जाईल असे जाहीर केले तसेच समाजासाठी सर्व कर्तव्ये पार पाडण्याचे आश्वासन दिले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरो रिजवाणी यांनी केले. यावेळी सिंधी समाजाचे अनिल ग्यानचंदानी, रतन कुकरेजा, सोमोमल नागदेव, सतीश मेवानी, नरेश कलाल यांचेसह अनेक जेष्ट सिंधी समाज बांधव उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या