वार्ड नंबर 2 मधील रस्त्या झाला चिखलमय-कोरची

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 09/07/2020 10:44 AM

आशिष अग्रवाल (कोरची प्रतिनिधी) :- कोरची येथिल वार्ड नंबर 2 मध्ये येत असलेल्या पडोटी कॉलोनीच्या मागच्या रस्त्यावरील खड्यामुळे पाऊस आल्यानंतर प्रचंड प्रमाणात चिखल व पाणि जमा होत आहे.यामुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करतांना नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असून अनेक नागरीक या रस्त्यावरून जातांना दुचाकी घसरून पडून अनेकांना दुखःपत झाली असून, या रस्त्यावरील खड्यामुळे दररोज येणारी कचरा गाडी सुध्दा रस्त्यावरून आत मध्ये न येता बाजूच्या मुख्य रस्त्यावरूनच वापस जात असते त्यामुळे या वार्डातील नागरिकांना मुख्य रस्त्यावर कचरापेठी घेऊन जावे लागत असून खड्यात चिखल असल्यामुळे अनेक नागरिक घसरुन पडण्याची भीती नाकारता येत नसुन नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरूस्ती करीता या वार्डातिल नागरिकांनी अनेकदा नगर पंचायत येथे वारांवार निवेदने देऊन सुध्दा या कडे प्रशासनं लक्ष देत नसल्यामुळे या वार्डतिल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सदर बाबीकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरूस्ती करावी अशी विनंती नागरिकांकडून केली जात आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या