*निराधार ,विधवा व गरजू महिलांना अनुदानासाठी बीपीएल ची अट रद्द करा-आमदार डॉ.देवराव होळी*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 09/07/2020 11:00 AM

निखिल राखडे (गडचिरोली प्रतिनिधी) :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूल मंत्री बाळा थोरात यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी संजय गांधी आर्थिक कुटुंब सहायता योजना व संजय गांधी निराधार योजनांसाठी मागणी *दिनांक 8 जुलै 2020* *गडचिरोली* निराधार ,विधवा व गरजू महिलांना गांधी कुटुंब सहाय्यता व निराधार योजनेअंतर्गत असणाऱ्या अनुदानासाठी लागणारी बीपीएल ची अट रद्द करावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी राज्य सरकारला केली आहे. संजय गांधी आर्थिक कुटुंब सहाय्यता योजने अंतर्गत निराधार ,विधवा व गरजू महिलांना 20 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत १हजार रुपयांचे मासिक मानधन दिले जाते.परंतु बीपीएल मध्ये नोंद असणाऱ्या महिलांनाच असे अनुदान दिले जात आहे.परिणामी बीपीएल मध्ये नाव समाविष्ट नसणाऱ्या माता भगिनी यापासून वंचित आहेत. त्यामुळे शासनाने या योजनांसाठी बी.पी.एल.ची अट रद्द करून कमीत कमी उत्पन्नाची मर्यादा निश्चित करावी जेणेकरून या गरीब गरजू निराधार विधवा माता भगिनींना अनुदान देता येईल. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन निराधार ,विधवा व गरजू महिलांना या अनुदानासाठी लागणारी बीपीएल ची अट रद्द करावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूल मंत्री बाळा थोरात यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या