शाळा जोपर्यंत उघडणार नाहीत, तोपर्यंत पालकांकडून फी मागू शकणार नाहीत 'या' राज्य सरकारचा खाजगी शाळांना इशारा..

  • मुख्यसंपादक (Kolhapur)
  • Upadted: 09/07/2020 11:48 AM

खासगी शाळा जोपर्यंत उघडणार नाहीत, तोपर्यंत पालकांकडून फी मागू शकणार नाहीत, यासंदर्भातील घोषणा राजस्थानचे शिक्षण राज्यमंत्री गोविंदसिंह डोटासरा यांनी केली. राजस्थान;-शिक्षण विभागाचे उपसचिव अता उल्लाह यांनीही यासंदर्भात आदेश जारी केले असून विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आदेशात काय? :शाळा सुरू होईपर्यंत खासगी शाळांनी पालकांवर फीसाठी दबाव आणू नये, अशा शाळांनी फी मागितल्याच्या तक्रारी आल्यास त्या शाळा संचालकांविरोधात कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पालकांकडून फी न घेणे, खासगी शाळांसाठी आव्हानात्मक असून गावांमध्ये सुरू असलेल्या छोट्या शाळा वाचवण्यासाठी लवकरच दिलासादायक निर्णय घेणार असल्याचेही डोटासरा म्हणाले.

Share

Other News

ताज्या बातम्या