Sunday 20 July 2025 09:48:01 AM

मिरज जंक्शनच्या आधुनिकीकरणास रेल्वे मंत्र्यांचा निधी, नागरिक जागृती मंचने केले स्वागत

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/06/2025 7:27 PM



*मिरज जंक्शनचे आधुनिकीकरण व जलद विकासासाठी रू १२८ कोटी मंजूर*

*मिरज जंक्शनचा कायापालट व विकास योजनेचा सांगली जिल्हा नागरीक जाग्रुती मंच तर्फे स्वागत*

*आता मिरज जंक्शनवरून प्रवासी व माल वाहतूक जलद होईल - सतीश साखळकर

*माननीय रेल्वेमंत्र्यांनी  १२८.७८ कोटी रुपये खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईन प्रकल्पाला मान्यता दिली*

माननीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि मालवाहतूक कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, मध्य रेल्वे अंतर्गत रुपये १२८.७८ कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईन (१.७३ किमी) प्रकल्पाला मान्यता दिली आहे.

मल्टी ट्रॅकिंग/फ्लायओव्हर/बायपास लाईन क्षमता वाढीअंतर्गत प्रस्तावित या धोरणात्मक उपक्रमाचे उद्दिष्ट मिरज जंक्शनवरील रेल्वे परिचालन लक्षणीयरीत्या सुलभ करणे आहे, जे मिरज-पुणे, मिरज-कोल्हापूर, मिरज-पंढरपूर आणि मिरज-लोंढा सारख्या मार्गांना जोडणारा एक प्रमुख इंटरचेंज पॉइंट आहे.

सध्या, कुर्डुवाडी किंवा हुब्बल्लि येथून येणारे आणि कोल्हापूर येथे जाणाऱ्या गाड्या, इंजिन किंवा ब्रेकव्हॅन रिव्हर्स करताना सरासरी १२० मिनिटे मिरज येथे अडकून पडतात. प्रस्तावित कॉर्ड लाईनमुळे या परिचालन विलंबांना दूर केले जाईल, ज्यामुळे नेटवर्क कार्यक्षमता सुधारेल. 

पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि या प्रदेशात मालवाहतूक आणि प्रवासी गाड्यांचे कार्यक्षमतेने संचालन करण्याचा मार्ग मोकळा होईल. यामुळे प्रवाशांची मिरज ते कोल्हापूर जलद प्रवासाची दीर्घकाळापासून असलेली मागणी पूर्ण होणार आहे.

रेलवे मंत्रालयाने देशातील महत्वपूर्ण मिरज जंक्शन साठी 128 कोटी  निधि दिल्याबदल सांगली ज़िल्हा नागरिक जागृति मंच तर्फे रेलवे मंत्रालय व मध्य रेलवेचे आभार सतीश साखळकर यानी मानले आहे.

पुणे, सोलापूर, हुबळी व कोल्हापूरला जोडणारा सांगली जिल्ह्यातील मिरज रेल्वे जंक्शन पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख सेतू असून अनेक वर्षांपासून हा जंक्शन दुर्लक्षित होता.
पण आता रेल्वे मंत्रालयाने मिरज जंक्शनचे आधुनिकीकरण विस्तारीकरण व कोड लाईन या प्रकल्पाला मंजुरी देऊन 128 कोटीचा निधी दिल्याबद्दल रेल्वे मंत्र्यांचे आभार.

या प्रकल्पामुळे मिरज स्टेशनचा सुधार होईल, रेल्वे रुळांची संख्या वाढेल, सिग्नलिंग सिस्टीम मध्ये सुधारणा होईल व प्रवासी तसेच महल वाहतूक गाड्यांना तासनतास मिरज जंक्शन येथे ताटकळत राहणार राहावे लागणार नाही.

या प्रकल्पामुळे कोल्हापूर-सोलापूर तसेच मिरज-सोलापूर प्रवास जलद गतीने होणार व मिरज जंक्शन वरून नवीन रेल्वे गाड्या सुरू होण्यासाठी मार्ग मोकळा होईल. 

एकूणच पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेच्या विकासासाठी हे एक चांगले पाऊल आहे

Share

Other News

ताज्या बातम्या