स्मार्ट मीटर बसवण्याबाबत नागरिकांचा विरोध होता त्यासाठी ग्राहकांच्या वर दबाव आणण्यासाठी महावितरण एक नवीन शक्कल लढवली होती रीडिंग घ्यायला माणसं नाही येत म्हणून अवरेज बिल देऊन लोकांना ब्लॅकमेल करायचा उद्योग होता
आम्ही याबाबत मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे याबाबत कळवले होते त्या अनुषंगाने महावितरणने परत रीडिंग घेण्यासाठी जाहीर निविदा मागवल्या आहेत
वीस ग्राहकांना या माध्यमातून आम्ही आवाहन करत आहोत कोणतेही आवरेज आलेले बिल भरू नका रीतसर रीडिंग घेऊन आलेले बिलंच भरा
कारण आपल्या लोकप्रतिनिधींच्या अखत्यारीत महावितरण येत नाही त्यामुळे नुकत्याच झालेले विधानसभेचे अधिवेशन असेल काही अपवाद विधान परिषद विधानसभा सदस्य सोडून किंवा आपल्या जिल्हा पातळीवर झालेल्या आढावा मीटिंगमध्ये याबाबत कोण सुद्धा बोललेले दिसून येत नाही असो आपण आपल्याला त्रास होत आहे आपणच याबाबत लढा देऊ...
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.