पाडळी शिंदे (प्रतिनिधी):- देऊळगाव राजा तालुक्यात येणारे शिवनी आरमाळ येथे लघु पाटबंधारे विभागाचा प्रकल्पा असून त्या प्रकल्पाच्या विंग वालला लागूनच आतील भागात गढूळ येत असून ते सांडव्याद्वारे पाणी नदी पात्रात येत असल्याने कपिला नदीत गढूळ पाण्याचा विसर्ग सुरू असून शिवणी आरमाळ पाडळी शिंदे येथील ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला असून प्रशासनाने तात्काळ या वालाची पाहणी करून वेलीच उपाययोजना करणे गरजेचे आहे तसेच सदर प्रकल्पाला विविध समस्यांचे ग्रहण लागलेले असताना प्रशासनाचा दोन वर्षांपासून वेळकाढूपणा कोकणातील तिवरे धरण फुटल्यानंतर शिवणी आरमाळ प्रकल्प यांच्या वरील विविध प्रकारच्या समस्या दूर करण्याची मागणी होत होती त्यात संरक्षण भिंती वर झाडाझुडपे वाढलेली असताना पीचिंग सुद्धा उघडी पडलेली आहे सांडव्यातून सुद्धा गळती होत होती तसेच विंग वाल सुद्धा गळती लागलेली होती सदर प्रकल्पावरील या समस्या तत्काळ मार्गी लावावे अशा आशयाचे वृत्त विविध वृत्तपत्रातून गेल्या दोन वर्षापासून प्रकाशित होत असून प्रशासनाकडून प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे उत्तर मिळत आहे सदर प्रकल्पाखाली शिवणी आरमाळ आरमाळ पाडळी शिंदे ही गावे येतात या दोनही गावांला लागूनच कपिला नदी वाहते व काल रात्रीपासून कपिला नदीत गढूळ पाणी येत असल्याने काही युवकांनी आज २४सप्टेंबर च्या सकाळी धरणावर जाऊन पाहिल्या पाहिले असता सदर विंग वाल मधून गढूळ पाणी येत असल्याचे दिसून येताच 2006 साली सुद्दा या प्रकल्पाच्या विंग वाल च्या बाजूला सवरक्षण भिंतीला भगदाड पडले होते त्यात प्रशासनाकडून सीसे टाकण्यात आले होते व आता सुद्धा त्याच विंग वाल मधून गढूळ पाणी येत असून प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी ही मागणी पाडळी शिंदे व शिवणी आरमाळ ग्रामस्थांकडून होत आहे.
सदर प्रकाराबाबद लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अभिषेक बोरगव्हर देऊळगाव राजा यांच्याशी संपर्क साधला असता तात्काळ दखल घेऊन पाहणी करून काय आवश्यक त्या उपाय योजना करू अशी माहिती RTI चे प्रतिनिधी यांचेशी बोलताना दिली