कोरची येथे 9 दिवसाचा जनता कर्फ्यू

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 24/09/2020 3:09 PM

कोरची :-

             कोरची तालुक्यात कोरोना विषाणू ने थैमान घातला असून शहरात सुद्धा आता कोरोना बाधित रुग्णांच्या संख्ये मध्ये झपाट्याने वाढ होत असल्या कारणाने कोरची येथील व्यापारी संघटनेने दिनांक 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत नऊ दिवसाच्या 'जनता कर्फ्यू' पाडण्याचा निर्धार केला आहे. 
              जनता कर्फ्यू पाळण्याकरिता दिनांक 23 सप्टेंबरला सायंकाळी कोरची येथील बाजार चौकात शासकिय अधिकारी, पदाधिकारी, राजकीय पक्षाचे नेते तसेच व्यापारी वर्गाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दुकानाचे वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 निर्धारित करण्यात आले व दिनांक 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत औषधी विक्रीचे दुकान सोडून संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार असून मास्क घालून बाहेर निघणे बंधनकारक राहणार असल्याचे प्रतिपादन तहसीलदार भंडारी यांनी केले. अन्यथा दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. 
                 या बैठकीला तहसीलदार छगनलाल भंडारी, पोलीस उपनिरीक्षक महेश कोंडुभैरी, पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल, नगरपंचायतीचे हाके, नगरसेवक शामलाल मडावी, नगरसेवक मनोज अग्रवाल, आनंद चौबे, देवराव गजभिये, सदरुद्दिन भामानी, नंदकिशोर वैरागडे, नितीन रहेजा, विकास धुवारिया, गजेंद्र पटेल, तुळशीराम अंबादे इत्यादी कर्मचारी, व्यापारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते व सर्वानुमते 'जनता कर्फ्यू' पाळण्याचे आवाहन करण्यात आले.









आशिष अग्रवाल (गडचिरोली जिल्हा मुख्य संपादक)
7757005944

Share

Other News

ताज्या बातम्या