*आज जनता कर्फ्यू लावण्यासंदर्भात तहसील कार्यालयात सर्वपक्षीय बैठक*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 24/09/2020 5:23 PM

आरमोरी :-

आरमोरी शहरात व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्यावर आळा घालण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने आज गुरुवार 24 सप्टेंबर आरमोरी शहरात जनता कर्फ्यू लावण्याच्या संदर्भात तहसील कार्यालयात दुपारी 12 वाजता नगरपरिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची सर्व पक्षीय नेते व्यापारी व व्यावसायिक यांची बैठक घेण्यात आली व त्या बैठकीत दि. 28/9/2020 ते 5/10/2020पर्यंत लाकडाऊन व जनता कर्फ्यू ठेवण्याचे ठरविण्यात आले या बैठकीत व्यापारी संगठनेचे अध्यक्ष व नगरपरिषद पदाधिकारी तसेच आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर सूर्यवंशी यांच्या उपस्थित हा निर्णय घेण्यात आला तरी 8 दिवस जनता कर्फ्यू असल्यामुळे आरमोरी शहरातील सर्व दुकानें बंद राहतील व बिना मास्क कुणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन नगरपरिषद नगराध्यक्ष पवन नारनवरे यांनी केले




मोशीम शेख आरमोरी प्रतिनिधी 

93073 97618

Share

Other News

ताज्या बातम्या