वाडसा :-
कोरोना संकटामुळे झाडीपट्टीतील शेकडो कलावंत व निर्माता यांच्या वर आलेल्या आसमानी संकटाचा अखील झाडीपटटीनाट्य विकास महामंडळ करणार शासन दरबारी पाठपुरावा... शिष्टमंडळ मुंबईला जाऊन घालनार मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्र्यांना साकडे
आज दि.23/9/2020 ला अखील झाडीपटटी नाट्य विकास महामंडळाच्या कार्यकारिणीची सभा आयोजित केली होती. त्यामध्ये यावर्षी ऊदभवलेल्या कोरोना संकटामुळे झाडीपटटीतील नाटकांचे प्रयोग शासनाच्या परवानगी शिवाय सादर करणे शक्य नाही. त्यामुळे झाडीपटटीतील नाट्य संचामध्ये कार्यरत पुरुष कलावंत आणी स्रि कलावंत, संगीतकार, नेपथ्यकार ,साऊंड मालक व नाटकांवर अवलंबून असलेले सहकारी व नाट्य निर्माता यांच्या वर ऊपासमारीची वेळ आलेली आहे.ही कलावंतांची आर्त हाक शासन दरबारी पोहचवुन कलावंतांना शासनाकडून आर्थिक मदत आणी पुनश्च नाट्य प्रयोग सुरू करण्यासाठी शासनाच्या वतीने परवानगी मीळावी यासाठी अखील झाडीपटटी नाट्य विकास महामंडळाच्या वतीने एक शिष्टमंडळ मुंबई येथे जाऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब तसेच सांस्कृतिक मंत्री अमीत देशमुख तसेच मंत्री मंडळातील मंत्री महोदयांना झाडीपटटीतील कलावंतांच्या मागण्यांचे निवेदन परस्पर देण्याचे सर्वानुमते ठरले.
या सभेमध्ये महामंडळाचे अध्यक्ष यशवंतरावजी ढोरे, सचिव प्रल्हाद मेश्राम, उपाध्यक्ष संदेश आनंदे , कोषाध्यक्ष नित्यानंद त्र्यंबक बुद्धे , सहसचिव जयप्रकाश बावनथडे तसेच कार्यकारिणी सदस्य नितीन नाकाडे, अशोक दुधकुवर,कीरपाल सयाम,हिरालाल सहारे (पेंटर),बालु नेवारे, ताजुलभाऊ उके व डेकोरेशन संघटनेचे शामरावजी खुणे ऊपस्थित होते.
फिरोज लालानी (वाडसा तालुका प्रतिनिधी)
9404822885