बसवकल्याणचे आमदार बी. नारायणराव यांचे निधन...

  • रिजवान मकानदार (Latur)
  • Upadted: 24/09/2020 6:36 PM


बिदर : बसवकल्याणचे काँग्रेसचे आमदार बसवंतपूर नारायण नरसाप्पाराव उर्फ
बी. नारायणराव (वय ६५) यांचे कोरोनामुळे बेंगलुरु येथील खाजगी रुग्णालयात गुरुवारी निधन झाले.

३१ऑगस्ट रोजी त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली व १ सप्टेंबर रोजी ती पॉझिटिव्ह आल्याने २ सप्टेंबर रोजी लगेच बेंगळुरू येथील खाजगी मणीपाल दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला प्रकृतीत सुधारणा होत होती. पण न्यूमोनिया, रक्तदाब, शुगर यामुळे त्यांची प्रकृती ढासळत गेली. तेव्हा पासून ह्यँटिलेटरवर ठेवण्यात आले. मणीपाल दवाखान्यात २५ दिवसापासून बी. नारायणराव कोरोनाशी लढा देत होते. उपचारादरम्यान दि.२४ सप्टेंबर वयाच्या ६५ वर्षी दुपारी ३:५५ वा. अखेरचा श्वास घेतला.

एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेले बी. नारायणराव हे अतिशय हुशार होते. बिदर जिल्ह्यातील मुळ गावी बसवंतपूर येथे ३० जुन १९५४ रोजी जन्मलेले नारायणराव यांचे प्राथमिक शिक्षण बसवंतपुर व बिदर येथील बीव्हीबी काँलेजमधे ग्रॅजुवेशन  पुर्ण झाले. त्यानंतर काँग्रेस व सेक्यूलर जनता दल  सरकारच्या काळात त्यांनी फारेस्ट चेअरमन म्हणून काम पाहिले. त्यानंतर बसवकल्याण आमदार होण्याचे स्वप्न १९८३ पासून पाहत होते. ते स्वप्न २०१८ मध्ये आमदारकीच्या निवडणुकीत पूर्ण झाले होते. पण दुर्दैवाने कोरोनाने त्यांना आपला कार्यकाळही पूर्ण करता आला नाही...

Share

Other News

ताज्या बातम्या