जिल्हा परिषद अंतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्या

  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 24/09/2020 7:55 PM

शासन स्तरावरुन जिल्हा परिषद,उस्मानाबाद अंतर्गत महाराष्ट्र विकास सेवा अंतर्गत अधिकारी वर्ग-1,वर्ग-2 या संवर्गातील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,उस्मानाबाद अनुप शेंगुलवार यांची बदली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली या ठिकाणी झालेली असून त्यांच्या जागी प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर ए.जी.नवाळे हे दि.04सप्टेंबर 2020 रोजी रुजू झालेले आहेत. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद,उस्मानाबाद अजिंक्य पवार यांची बदली जिल्हा परिषद ठाणे येथे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.)या पदावर झालेली असुन त्यांचे जागी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)जिल्हा परिषद हिंगोली एन.एस.दाताळ हे दि.18 सप्टेंबर 2020 रोजी रुजू  झालेले आहेत.
गटविकास अधिकारी पंचायत समिती परंडा आर.व्ही.चकोर यांची बदली गटविकास अधिकारी पंचायत समिती पालम जिल्हा परभणी या ठिकाणी झालेली आहे. असे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांनी कळविले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या