स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची उल्लेखनिय कामगिरी:-

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 24/05/2026 9:53 AM


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे )

 अमेरिकन नागरिकांशी ऑनलाईन बेकायदेशिर कॉल सेंटरद्वारे संपर्क साधून फसवणुक करणारी टोळी जेरबंद

सातारा दि:श्री निखील पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी बोगस कॉल सेंटर चालवणारे यांचेवरती लक्ष ठेऊन नागरिकांची डिजिटल अरेस्ट द्वारे फसवणूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना विश्वजीत घोडके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या अधिपत्त्याखाली एक विशेष पथक तयार करुन त्यांना वरील प्रमाणे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.

दिनांक 22/5/2026 रोजी श्री विश्वजीत घोडके पोलीस निरीक्षक यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे सागर हरिश्चंद्र सूर्यवंशी हा कोरेगाव ते रहिमतपूर जाणारे रोडवरील सुभाषनगर येथील रिलायबल अपार्टमेंट मधील चौथ्या मजल्यावर श्रीसाई लॉजिस्टीक्स अॅन्ड कन्सल्टंस हे बोगस कॉल सेंटर सुमारे फेब्रुवारी २०२६ सुरु असून सदर कॉल सेंटरमध्ये अमेरिकन नागरीकांना तुम्ही अॅमेझॉन वरुन एक वस्तू ऑर्डर केली आहे त्याचे पैसे दयावे लागतील अशी भिती दाखवून त्यांची फसवणूक करण्याकरीता बोगस कॉल सेंटर चालविले जात आहे, अशी माहिती मिळाल्याने त्यांनी त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेवून दिनांक 23/05/2026 रोजीचे 00.55 वा. मिळाले बातमीचे ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी 17 इसम व 4 महिला बेकायदेशिर श्रीसाई लॉजिस्टीक्स ॲन्ड कन्सल्टंस एलएलपी या नांवचे कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांशी ऑनलाईन अॅपद्वारे संपर्क साधुन, तुम्ही अमॅझॉन कंपनीतुन वस्तु ऑर्डर केली आहे ती वस्तु तुम्हाला लवकर मिळण्याकरीता आम्ही तुम्हाला सहकार्य करु असे सांगतात त्यावेळी समोरील अमेरिकन इसमाने त्यांना मी ऑर्डर केलेली नाही असे सांगितल्यास त्याच्या मोबाईल क्रमांकावर एक बनावट मेसेज व त्यामध्ये बनावट ऑर्डर क्रमांक पाठवून देवून, सदर ऑर्डर तुम्हाला नको असल्यास तुम्ही एखादया मॉलमध्ये जावून तेथील गिफ्ट व्हाउचर खरेदी करुन त्याद्वारे आम्हाला डॉलर स्वरुपात रक्कम पाठवा असे सांगतात त्यास अमेरिकन नागरिकाने नकार दिल्यास त्यास डिजिटल अरेस्ट होण्याची भिती घालून गिफ्ट व्हाऊचरद्वारे त्यांच्याकडून मोठया प्रमाणात डॉलर स्वरुपात पैसे प्राप्त करुन त्यांची फसवणुक करत असल्याचे निष्पन्न झालेने नमुद इसमांच्या विरुध्द कोरेगांव पोलीस ठाण्यास

गु.र.नं. 183/2026 भान्यासंक 316 (2), 318 (4), 61 (1), 3(5) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (क), 66 (ड) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई श्री निखील पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती राजश्री तेरणी उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वजीत घोडके पोलीस निरीक्षक, अरुण देवकर पोलीस निरीक्षक कोरेगाव पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, शिवाजी गुरव, विजय कांबळे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, शरद बेबले, मंगेश महाडीक, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमोल माने, लैलेश फडतरे, जयवंत खांडके, हसन तडवी, अमित झेंडे, संदिप पाटील, राजु कांबळे, अरुण पाटील, स्वप्नील शिंदे, प्रविण कांबळे, अमित सपकाळ, अमित माने, अविनाश चव्हाण, अजित कर्णे, मुनीर मुल्ला, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, महेश निर्मळ, संकेत निकम, धीरज महाडीक, रोहित निकम, सचिन ससाणे, स्वप्निल दौंड, मपोहवा शकुंतला सणस,अधिका वीर यांनी सहभाग घेतला आहे

Share

Other News

ताज्या बातम्या