वीज वितरण कंपनीचे सुरू असलेले 36 केव्ही वीज उपकेंद्राचे बांधकाम थांबविण्याच्या मागणी- अंतरगाव

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 28/10/2020 11:10 PM

कुरखेडा / अंतरगाव :-

         कुरखेडा तालुक्यातील अंतरगाव येथील वीज वितरण कंपनीचे सुरू असलेले 36 केव्ही वीज उपकेंद्राचे बांधकाम थांबविण्याच्या मागणीसाठी अंतरगाव वासियांनी आज धरणे देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. सन २०१८-१९ मध्ये तत्कालीन ग्रामसेवक सरपंच व ग्रामपंचायत च्या इतर पदाधिकाऱ्यांनी खोटे कागदपत्र सादर करून ग्रामस्थांच्या माघारी स्वमर्जीने ठरावास मंजुरी दिली.त्यानुसार जानेवारीमध्ये वीज वितरण कंपनीने उपकेंद्राच्या बांधकामाला सुरुवात केली ही बाब ग्रामस्थांच्या उशिरा लक्षात आली.त्यांनी याबाबत ग्रामपंचायत ला जाऊन माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता माहिती देण्यास सरपंचाकडून टाळाटाळ करण्याचा आरोप केला जात आहे संबंधित बाबीची दखल पोलिसांनी घ्यावी म्हणून पुराडा पोलीस स्टेशन मध्ये लेखी तक्रार दाखल करण्यात आली.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार २०१८-१९ मध्ये झालेल्या ग्रामसभेत सदर उपकेंद्रासाठी सर्वे क्र.१० ची जागा देण्याची चर्चा करण्यात आली होती.मात्र सदर बांधकाम क्र.१६ मध्ये सुरू असल्याने व सर्वे नंबर १६ ही जागा गेल्या चार पिढ्यांपासून गावाच्या विकासासाठी राखून ठेवण्यात आली आहे.या जमिनीचा वापर गावातील गुरे चराईसाठी, शंकर पट,स्मशानभूमी करिता राखून ठेवण्यात आली असल्याची तक्रार ग्रामस्थांनी सामाजिक कायदेशीर मदत केंद्राकडे करण्यात आली.त्यानुसार संस्थेच्या मदतीने पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून अंतरगाव येथे आज गावकऱ्यांनी धरणे आंदोलन केले.यावेळी ग्राम सभेचे अध्यक्ष यशवंत झाेडे,ग्रामकोष समितीचे अध्यक्ष मधुकर जमदाळ,वन समितीचे सचिव केशव राऊत,पोलीस पाटील शामराव जगदाळ,प्रकाश झाेडे,मुखरू मसराम,अरविंद नाकाडे,सुक्राम कोरेटी,छगन सरवा,खुशाल नाहमूरते,माजी सरपंच केशव दरवडे,देवानंद सुकारे,रमेश जमदाळ,नेतृत्व फाऊंडेशनचे कार्यकर्ते सुरज गावतुरे,अनिल नागोसे,चेतन किरसान व ग्रामस्थ उपस्थित होते. 










नितीन देविकार (गडचिरोली जिल्हा उपसंपादक)
9404231937

Share

Other News

ताज्या बातम्या