कोरोनामुळे वाढलेल्या मेंदूच्या समस्या.

  • श्री मल्हारी घाडगे (Navimumbai)
  • Upadted: 29/10/2020 7:53 AM

कोरोनाच्या (coronavirus) आजारातून रुग्ण मोठ्या संख्येनं बरे होताना दिसत आहेत. पण त्यानंतर या रुग्णांना विविध आजारांना तोंड द्यावं लागत आहे. सध्या कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना मेंदूच्या समस्या निर्माण होत असल्याचं नवीन संशोधनातून समोर आलं आहे. त्याचबरोबर मेंदूचं इन्फेक्शन होत असून ज्या रुग्णाला सर्वात गंभीर संसर्ग झाला आहे त्याचा मेंदू 10 वर्षांनी म्हातारा होत असल्याचं संशोधनात निदर्शनास आलं आहे.लंडनमधील इंपिरिअल कॉलेजच्या संशोधकांनी कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांचा अभ्यास केला. कोरोनातून रुग्ण बरा झाल्यानंतर देखील त्यांच्या मेंदूला पोहोचलेली हानी कायम राहत असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला.

Share

Other News

ताज्या बातम्या