ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

जागतिक एड्स निर्मुलन दिन साजरा


  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 12/1/2020 5:52:46 PM

 एच.आय.व्ही अर्थात एड्स या आजाराविषयी जनजागृती व्हावी म्हणून समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या विवेकानंद युवा मंडळातर्फे शासकीय रुग्णालयांमध्ये माहिती पत्रके व पोस्टर्स वाटून 'जागतिक एड्स निर्मुलन दिन' साजरा करण्यात आला. रुग्णालयामधील एचआयव्ही विभागातील श्री.शिनगारे साहेब, श्री.शितोळे साहेब यांच्या समवेत जिल्हा चिकित्सक डॉ.मुल्ला साहेब, डॉ.सचिन देशमुख, डॉ.कानडे साहेब व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसमवेत  जनजागृती करून हा 'एड्स निर्मूलन दिन' साजरा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी "प्रत्येक वेळी कुठल्याही वैद्यकीय विषयक कार्यक्रम व मार्गदर्शनाच्या वेळी जिल्हा रुग्णालय संपूर्णपणे मंडळाला सहकार्य करेल" असे सांगितले. यावेळी विवेकानंद युवा मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते बाळकृष्ण साळुंके, स्वप्नील देशमुख, कृष्णा एडके, महेंद्रप्रताप जाधव, समर्थ शिरसीकर, ऋषिकेश मासाळ, नेहरू युवा केंद्राचे रोहन गाढवे, प्रशांत मते, विजयकुमार कोळगे व आदी कार्यकर्ते, वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

Share

Other News