शिवसेना सदस्य नोंदणी केलेल्या प्रत्येकाला अधिकृत ओळखपत्र देणार :- वैभव नाईक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/12/2020 9:49 PM


  
*आंब्रड ,कसाल,तेंडोली नेरूर जि. प.  मतदारसंघात   शिवसेना सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रम संपन्न      

        सदस्य नोंदणी मुळे शिवसेना संघटना अधिक बळकट होणार असून  येणाऱ्या निवडणुकांमध्ये  शिवसेना उमेदवाराला निवडून आणण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.  सदस्य नोंदणीचा फॉर्म भरणाऱ्या प्रत्येकाला शिवसेना सदस्यत्वाचे  अधिकृत ओळखपत्र देण्यात येणार आहे. कुठल्याही कार्यालयात आपली ओळख दाखविण्यासाठी  या ओळखपत्राचा उपयोग होणार आहे. त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी  जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी असे आवाहन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले. 

      कुडाळ तालुक्यातील आंब्रड   कसाल, तेंडोली व नेरूर  जिल्हापरिषद मतदारसंघात आज  शिवसेना सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी  आमदार वैभव नाईक, कुडाळ तालुका निरीक्षक संग्राम प्रभुगावकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्यांना सदस्य नोंदणीबाबत मार्गदर्शन केले.
         यावेळी  कुडाळ तालुका निरीक्षक संग्राम प्रभुगावकर म्हणाले, येणाऱ्या निवडणुका ह्या ग्रामपंचायत नगरपालिका,पंचायत समिती जिल्हापरिषदच्या निवडणूका आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा आपल्याला फडकवायचा  आहे.जिल्हा परिषेदेत मनमानी कारभार सुरू आहे. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी शिवसेनेचे सदस्य निवडून येणे गरजेचे आहे. त्यामुळे सदस्य नोंदणी हा येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा उपक्रम आहे. त्यामुळे प्रत्येक बुथवर १५ क्रियाशील कार्यकर्ते आणि त्या प्रत्येक क्रियाशील कार्यकर्त्याने १५-१५ सदस्य तयार केले तर त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती धरून  हि संख्या ३५० च्या वर होणार  त्यामुळे  शिवसेना उमेदवाराला हि संख्या विजय संपादन करण्यास निर्णायक ठरणारे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सदस्य नोंदणीवर भर द्या असे  संग्राम प्रभुगावकर यांनी सांगितले. 
      याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमसेन सावंत,  महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक,तालुका संघटक  बबन बोभाटे उपसभापती जयभारत पालव, तालुका महिला संघटक  स्नेहा दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती 
         याप्रसंगी   कसाल येथे विभागप्रमुख नागेश ओरोसकर,  परशुराम परब, अवधूत मालणकर, छोटू पारकर, बाळा कांदळकर, भगवान परब, सुनील जाधव, नाना नाडकर्णी, संतोष शिरवडकर,शुभम परब, वसंत बांबूळकर, दर्शना म्हसकर, मनस्वी परब, प्रीती देसाई, दशरथ गवाणकर, अरुण राणे, गणेश मेस्त्री, रमेश वेंगुर्लेकर, रमेश वायंगणकर,  
             नेरूर येथे विभाग प्रमुख शेखर गावडे,  रुपेश पावसकर, सुशील चिंदरकर, अरुण साळगावकर, मंजुनाथ फडके, अरुण चव्हाण, बाळा पावसकर, हेमंत नेरुरकर, किरण कोचरेकर, भूपेंद्र चेंदवणकर, मंगेश बांदेकर, शाम परब, तात्या हळदणकर, प्रवीण नेरुरकर, उत्तरा धुरी, नितीन सावंत 
            तेंडोली येथे अतुल बंगे, पं  स. सदस्य सुबोध माधव, अनघा तेंडोलकर, विभाग प्रमुख संदेश प्रभू, महेश वेळकर, वसंत कोंडकर, विठ्ठल ठाकूर, सुभाष परब, शीतल परब, सचिन गावडे, संदीप वारंग, संदीप पेडणेकर, निलेश सर्वेकर, एम. बी गावडे,  उमेश घाटकर आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या