3 फेब्रुवारी रोजी सरपंच पदाची सोडत.

  • Mahesh Salunke (Dombivali )
  • Upadted: 22/01/2021 11:26 PM

3 फेब्रुवारी रोजी सरपंच पदाची सोडत!


ठाणे   : ठाणे जिल्हयातील ग्राम पंचायतींचे सरपंचपदांची आरक्षण  सोडत बुधवार, दिनांक 03 फेब्रु. 2021 रोजी  सकाळी 11.00 वाजता  होणार आहे.

ठाणे जिल्हयातील ग्रामपंचायती साठी  ही सोडत दि.14 डिसेंबर 2020  रोजी आयोजित करण्यात आली होती,  सदर सरपंच पदाचे आरक्षण सोडत कार्यक्रमास पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात  आली होती.परंतु   आता नव्याने ही सोडत 3 फेब्रुवारी रोजी  संबधित तहसिलदार कार्यालयाच्या स्तरावर होणार आहे.

सरपंच पदाचे आरक्षण सोडत कार्यक्रम पार पाडताना, कोविड- 19 च्या अनुषंगाने घ्यावयाच्या खबरदारीबाबत शासनाकडून  निर्गमित प्रतिबंधात्मक उपाय योजना / मार्गदर्शक सूचनांचे  काटे कोरपणे पालन करावे असे जिल्हा धिकारी राजेश नार्वेकर यांनी  कळविले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या