23 केंद्रांवर 1हजार 805 आरोग्य सेवकांचे लसीकरण
ठाणे दि. २० ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रति बंधक लसीकरण मोहिमेत आज 23 केंद्रांवर 1 हजार 805 आरोग्यसेवकांचे लसीकरण करण्यात आले. आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी लसचा पहिला डोस घेतला आहे. सर्व आरोग्य क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधि कारी डॉ मनिष रेंघे आणि जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ कैलास पवार यांनी केले.
संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आज 23 केंद्रांवर 1हजार 805 आरोग्यसेवकांना लसीकरण करण्यात आले. हे प्रमाण 78.48टक्के आहे.
ठाणे मनपाच्या 4केंद्रांवर 231, कल्याण डोंबिंवली मनपाच्या 3 केंद्रांवर288, मीरा भाईंदर मनपाच्या 3 केंद्रांवर 249,नवी मुंबई मनपाच्या 4केंद्रांवर 400, भिवंडी मनपाच्या 3 केंद्रांवर 198, उल्हासनगर मनपा 1 केंद्रात 75, ठाणे ग्रामीणच्या 5 केंद्रांवर -364आरोग्यसेवकांना लस देण्यात आली आहे.