*फी घेतली तर बघा, नगरसेवक अभिजीत भोसले*
माझी भूमिका विद्यार्थीहितासाठी
शाळांनो फीसाठी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर करू नका
अशा तक्रारीसाठी मला संपर्क करा
संपर्क_9325599990
काल सांगली शहरातील मार्टिन इंग्लिश स्कुल मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मला तक्रार दिली की त्या शाळेत जवळपास 30-35 विद्यार्थ्यांना फीस भरले नसल्याच्या कारणावरून शाळेच्या ऑनलाईन अभ्यासक्रमासाठीच्या व्हाट्सअप ग्रुप वरून काढून टाकण्यात आलेलं आहे. फीस पूर्ण भरल्याशिवाय ऑनलाईन बाबतीत सवलत दिली जाणार नाही अशी शाळा व्यवस्थापणाची भूमिका आहे. सदर प्रकरणी मी स्वतः लक्ष घालून जिल्हा शिक्षणअधिकाऱ्यांकडे पोचून शाळा व्यवस्थापणास समोर बोलावून ह्या गोष्टीसाठी पालकांच्या विद्यार्थ्यांच्या बाजूने न्याय भूमिका घेतली.
ऑनलाईन शिक्षण त्वरित सुरु करणे, त्यासाठी उर्वरित अभ्यासक्रम वेळापत्रक शिक्षण विस्तार अधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांचेकडे लिखित देणे, ताबडतोब वगळलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या ग्रुप ला समाविष्ट करणे, फीस पालकांनी हफ्त्यात भरण्यास सवलत देणे, कोरोना काळातील अडचणी लक्षात घेऊन शासन निर्देशानुसार फी मध्ये सवलत देणे या सर्व न्याय बाबी मान्य केल्या तर फीस सवलतीसाठी सोमवार पर्यंत मुदत मागितली आहे. ह्याबद्दल जिल्हाधिकारी यांचे पातळीवर सुद्धा तक्रार करणार असून केवळ फी साठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून कुणी वंचित ठेवत असल्यास गय करणार नाही, प्रसंगी शाळेसमोर आणि शिक्षण अधिकाऱ्यांसमोर ठाण मांडून राहू पण एकही विद्यार्थी त्याच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहू नये ह्यासाठी सातत्याने काम करू अशी माझी व माझ्यासोबत ह्यात काम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांची भूमिका आहे. मी सर्वच शाळा व्यवस्थापन कमिटीस आवाहन करतो कृपया असे काही आपल्या शाळेत घडले असल्यास वेळीच सर्व विद्यार्थ्यांना शालेत सामावून घ्यावे. फी साठी शिक्षणापासून वंचित ठेऊ नये, हा काळ अडचणीचा आहे त्यामुळे चालू वर्षी केवळ फी साठी म्हणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नये अन्यथा तक्रार आल्यास हयगय केली जाणार नाही.
इथून पूढे शहरातील शाळेत असे प्रकार घडत असल्यास मला संपर्क करा - 9325599990 अभिजीत भोसले नगरसेवक सांमिकू महानगरपालिका
#मुलांच्या_शिक्षणासाठी_मी_आपल्यासोबत_उभा_आहे .. आपला अभिजीत भोसले नगरसेवक सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
जिल्हा सरचिटणीस सांगली शहर जिल्हा काँग्रेस