ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

परंडा तालुका सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, उमेदवारच नसल्याने 3 ग्रा. पं. चा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठविणार, आणि बहुमत येऊनही काही ग्रा.पं. चा कारभार येणार विरोधी गटाकडे


  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 1/23/2021 5:37:02 PM

आज दिनांक 22 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11:00 परंडा तालुक्यातील 70 ग्राम पंचायतीसाठी येणाऱ्या 2020 ते 2025 या कालावधीसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सुरुळीत पार पडला. त्यानुसार अनुसूचित जाती (SC) साठी 9 पद आरक्षीत करण्यात आले असून पैकी सोनारी, पाचपिंपळा, खानापूर, कात्राबाद ही 4 गावे अनुसूचित जाती (SC) सर्वसाधारण साठी राखीव ठेवण्यात आली. तर टाकळी, देऊळगाव, भांडगाव, कंडारी, लोहारा ही 5 गावे अनुसूचित जाती (SC) महिला साठी राखीव ठेवण्यात आलेत.

तसेच अनुसूचित जमाती (ST) साठी 01 पद आरक्षीत करण्यात आले असून ते आलेश्वर या गावासाठी अनुसूचित जमाती (ST) महिला साठी राखीव ठेवण्यात आलेत.

तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) साठी 19 पद आरक्षीत करण्यात आले असून पैकी साकत खु, साकत बु, राजुरी, हिंगणगाव खु, डोमगाव, डोंजा, सिरसाव, भोंजा, तांदुळवाडी ही 09 गावे नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) सर्वसाधारण साठी राखीव ठेवण्यात आली. तर रत्नापुर, वाकडी, कौडगाव, रुई, आवारपिंपरी, आरणगाव, ढगपिंपरी, कार्ला, खांडेश्वरवाडी, जवळा निजाम ही 10 गावे नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) महिला साठी राखीव ठेवण्यात आलेत.

तसेच खुल्या प्रवर्गातील म्हणजेच सर्वसाधारण (Open) साठी 43 पद आरक्षीत करण्यात आले असून पैकी वडनेर, खासापुरी, मलकापूर, आंदोरा, जाकेपिंपरी, गोसाविवाडी, पिंपळवाडी, कपिलापुरी, चिंचपूर खु, कुंभेफळ, कुंभेजा, पांढरेवाडी, धोत्री, कांदलगाव, कुक्कडगाव, हिंगणगाव बु, चिंचपुर बु, पारेवाडी, रोसा, वाटेफळ, देवगाव खु ही 21 गावे सर्वसाधारण (Open) साठी राखीव ठेवण्यात आली. तर देवगाव बु, आसू, बावची, आनाळा, शेलगाव, खासगाव, कोकरवाडी, मुगाव, भोत्रा, इनगोदा, उंडेगाव, रोहकल, पिंपरखेड, लोणी, काटेवाडी, शिराळा, घारगाव, दहिटना, नालगाव, येनगाव, वागेगव्हाण, जेकटेवाडी ही 22 गावे सर्वसाधारण (Open) महिला साठी राखीव ठेवण्यात आलेत.

परंतु, खासगाव व येणेगाव या 2 ग्राम पंचायतीसाठी त्यांच्या मध्यवर्ती निवडणूक झालेली आहे. 

तर अनुसूचित जातीचा उमेदवार नसल्याने बहुमत येऊनही पाचपिंपळा, आलेश्वर, लोहारा या ग्राम पंचायतीचे सरपंच पद विरोधी गटाला मिळणार आहे.

तसेच, कात्राबाद/सोनगिरी या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये अनुसूचित जाती (SC) चा उमेदवार नसल्याने आणि देऊळगाव व भांडगाव या गावातही अनुसूचित जाती (SC) चा उमेदवार नसल्याने आणि विशेष म्हणजे या ग्राम पंचायत मध्ये अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) साठी निवडणूकच झाली नाही. त्यामुळे तिथे या प्रवर्गाचे उमेदवारच नाहीत आणि त्या गावासाठी हे आरक्षण पडले आहे . त्यामुळे या तिन्ही गावांसाठी कायदेशीररित्या अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे या बाबतीत तहसिल कार्यालयाने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयास प्रस्ताव पाठवून मार्गदर्शन मागविण्यात येणार असल्याचे कळले आहे. त्यामुळे या गावांच्या निवडीत उशीर होणार आहे.

या सरपंच आरक्षण सोडतीस पीठासीन अधिकारी तथा डेप्युटी कलेक्टर श्रीमती. आंधळे मॅडम, परंडा तहसिलदार श्री. अनिलकुमार हेळकर, श्री. सुजित वाबळे नायब तहसिलदार, श्री. पांडुरंग इनामदार नायब तहसिलदार, श्री. प्रविण कावरे अ.का निवडणूक, श्री. आण्णा बनसोडे अ.का, श्री. दिपक चिंतेवार, अ.का.,जि. का. उस्मानाबाद, श्री. विजयकुमार बनसोडे यांच्यासह इतर निवडणूक कर्मचारी उपस्थित असून माजी आमदार श्री. ज्ञानेश्वर(तात्या) पाटील, जि.प. सभापती काका साळुंखे, जि.प. सभापती धनंजय सावंत, माजी पं स सभापती श्री. गौतम लटके सर, ऍड. संदीप पाटील, पंचायत समिती सदस्य श्री. गुलाबराव शिंदे, श्री. वाघमारे पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सदस्य श्री दिपक भांडवलकर, सरपंच बापू मिस्कीन, मज्जीद पटेल, शफील पटेल, ताहेर पटेल, दशरथ राऊत, अलीम बेग, मलिक (तात्या) मुजावर, ऍड. गोविंद कोटुळे तसेच तालुक्यातील इतर मातब्बर आजी- माजी सरपंच व सदस्य ही हजर होते. तसेच या निवडणुकीत प्रस्थापितांची माती करत धक्कादायक निकाल लागले असून, युवावर्गास जास्त पसंती व प्रतिसाद मिळाला आहे.

Share

Other News