ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

2021 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेना पक्षाचा वर्चस्व जिल्हयात भगवा झेंडा फडकवला - राजगोपाल सुल्वावार,शिवसेना जिल्हा प्रमुख गडचिरोली


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 3/2/2021 2:11:55 PM

            मागील अनेक वर्षापासून गडचिरोली जिल्हयात शिवसेना पक्षाचे अपवाद वळगळता ग्राम पंचायत मध्ये एक-दोन सदस्य निवडणूकीत निवडून यायचे असे असतांना पक्षासमोर फार मोठे आव्हान होते. गडचिरोली जिल्हयात एकेकाळी शिवसेना पक्षाचा वर्चस्व होता विशेषता आरमोरी विधानसभा मतदार संघात दोन वेळा आमदार पद भुषविले. आणि आरमोरी क्षेत्राला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणुन ओळखल्या जात होता. तीच परिस्थिती गडचिरोली विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची चांगली पकड होती व अहेरी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची पकड कमजोर होती. त्यानंतर भारतीय जनता पार्टी व शिवसेना युती झाल्यानंतर हळूहळू शिवसेना पक्ष कमजोर होत चालला होता.
युती सरकारमध्ये शिवसेना पक्षाचा पदाधिकारी कार्यकत्यांना स्थानिक युतीचे आमदार,खासदार न्याय देत नसल्यामुळे तसेच युतीचा धर्म न पाळल्यामुळे आंतरगत वादामुळे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते नाराज होवून घरी बसणे पसंद केले. त्याचाच फायदा घेवून पक्षातील कार्यकर्ताना फोडाफोडी करून पक्षाला कमजोर करण्याचे कार्य सतत सुरू होते. परंतु प्रामाणिक कट्टर शिवसैनिक कार्यकर्ते जिल्हयामध्ये पक्षासोबत ठामपणे उभे होते. 
अश्या परिस्थितीत गडचिरोली जिल्हयामध्ये शिवसेना पक्षाचे संघटनेचे काग वाढविण्यासाठी तसेच पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी शिवसेने समोर फार मोठे आव्हान होते. अश्या गंभीर परिस्थितीत मा. उध्दवजी ठाकरे साहेब, शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांनी तात्काळ निर्णय घेवून गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करून किशोर चंद्रकांत पोतदार, यांना जिल्ह्यात पाठविले. किशोर पोतदारजी यांनी आदेशाचा पालन करुन आपल्या पदाला न्याय देत रात्रौंदिवस पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी 15-15 दिवस मुक्कामी राहुन सर्व आजी माजी पदाधिका-यांना एकजुट करून पक्ष संघटनेचे काम मजबुत केले. संघटन बांधणीचे काम करीत असतांना किशोर पोतदार यांना अनेक अडचणी निर्माण झाले,वादविवादाला तोंड देत प्रामाणिकपणे कार्य करीत असतांना आरोप प्रत्यारोप कडे कधीच वळून पाहिले नाही.
यांचाच फायदा शिवसेना पक्षाला ग्राम पंचायती निवडणूकीच्या स्वरूपात यश प्राप्त करणे शक्य झाले.

गडचिरोली जिल्ह्याचे एकनाथ शिंदे,नगर विकासमंत्री तथा पालकमंत्री जिल्हा गडचिरोली यांच्या कुशल नेतृत्वात आणि गजाननराव किर्तीकर खासदार,शिवसेना पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रकाश वाघ साहेब,शिवसेना पूर्व विदर्भ समन्वयक, तसेच किशोर चंद्रकांत पोतदार, गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख, रामकृष्ण मडावी,माजी आमदार,शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख, रालगोपाल सुल्वावार, शिवसेना जिल्हाप्रमुख गडचिरोली यांच्या अथक प्रयत्नांने तसेच जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख,जिल्हा संघटक,जिल्हा समन्वयक,उपजिल्हाप्रमुख,तालुका प्रमुख,महिला आघाडी प्रमुख, शहरप्रमुख,विभाग प्रमुख,गट प्रमुख, शाखा प्रमुख, बीएलए प्रमुख,बुथ प्रमुख व सर्व शिवसैनिकांनी एकजुटीने परिश्रम केल्याने 2021 मध्ये झालेल्या सार्वत्रिक ग्राम पंचायत निवडणूकीमध्ये शिवसेना पक्षानी गडचिरोली जिल्हामध्ये जवळपास 52 ग्राम पंचायतीवर भगवा झेंडा फडकविला. तसेच महाविकास आघाडी सोबत अनेक ग्राम पंचायतीत आघाडीच्या माध्यमातून ग्राम पंचायती काबीज करून सत्ता स्थापन केले. यात शिवसेनाच्या सिंहाचा वाटा आहे. गडचिरोली जिल्हामध्ये एकुण 225 च्या वर शिवसेना पक्षाकडून ग्राम पंचायत सदस्य निवडूण आले. या भव्य विजयात गडचिरोली जिल्हयातील सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमाने जिल्ह्यात भगवा झेंडा फडकविला. हा विजय केवळ पदाधिकारी,शिवसैनिक कार्यकर्त्यांचेच  आहे.
 तसेच गडचिरोली जिल्हयातील शिवसेनाच्या उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल व जनसेवा करण्याची संधी दिल्याने सर्व मतदार बांधवाचे शिवसेना जिल्हा प्रमुख राजगोपालजी सुल्वावार यांनी आभार व्यक्त केले

प्रसिद्ध पत्रकाच्या माध्यमाने शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी आगामी नगर पंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत वरिष्ठांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हातील सर्व पदाधिकारी एकजूटीने व एकमताने काम केल्यास गडचिरोली जिल्हा भगवामय होईल असे ठामपणे गडचिरोली जिल्हा प्रमुख राजगोपालजी सुल्वावार यांनी प्रसिद्ध पत्रकाव्दारे जाहिर केले आहे.


इशांक दहागावकर (एटापल्ली तालुका प्रतिनिधी)
7588782301

Share

Other News