ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

गणेशपुर येथे एका इसमाची हत्या


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 3/2/2021 9:01:12 PM

कोरची :-

            तालुक्यातील गणेशपुर येथे मागील 7 दिवसांपासून नामे संतराम जाता हे इसम बेपत्ता होते परंतु याबाबतची माहिती पोलिस विभागाला देण्यात आलेली नव्हती अशी माहिती पोलिस विभागातर्फे देण्यात आली. मागील 7 दिवसापासून संतराम चा मुलगा व संतराम ची पत्नी युद्ध पातळी वर संतराम चा शोध घेत होते. परंतु काहीही थांगपत्ता लागत नसल्यामुले संतराम चा मुलगा प्रदीप याने गावातील चपरासी व इतर वरिष्ठांशी संपर्क करून मीटिंग बोलावली व शोध मोहीम सुरू केली. परंतु काही सुगावा लागला नाही दुसऱ्या दिवशी म्हणजेच एक मार्चला गावातील दोन इसमांनी माहिती दिली की संतरामच्या शेताजवळच असलेल्या नाल्याजवळ माशा घोंगावत आहे. खात्री करण्याकरिता गावकरी तेथे गेले असता त्या ठिकाणी संतराम यांचा मृत अवस्थेतील चेहरा दिसला व पूर्ण शरीर मातीने झाकले होते व चेहऱ्याला व डोक्याला जबर मार लागल्याने दिसून आले. परंतु सदर घटनेचे कारण अजुनही गुलदस्त्यात आहे. संतराम याला मारुन पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचे शरीर पुरण्यात  आले असल्याची शंका त्याच्या मुलांनी व्यक्त केली. 24 फेब्रुवारी पासून बेपत्ता असलेल्या संतराम ची हत्या कुठल्या वाद-विवाद वरून झाली ते कुठले दुसरे कारण हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस मदत केंद्र बेळगाव येथील पोलीस उपनिरीक्षक नितीश पोटे सदर तपासणी करत असून आरोपी चा पत्ता लावण्यास सुरुवात झालेली आहे सदर घटनेची संपूर्ण चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नितीश पोटे यांनी दिली.आशिष अग्रवाल (गडचिरोली जिल्हा मुख्य संपादक)
7757005944

Share

Other News