ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

छत्रपती शिवाजी विध्यापीठमधील सर्वंतोपरी सहाय्यास राष्ट्रवादी विध्यायी कांग्रेस सदैव तत्पर :- शुभम जाधव


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 3/3/2021 11:23:28 AM         खेलो इंडिया स्पर्धे मध्ये शिवाजी विद्यापीठा कडून प्रतिनिधित्व करून पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या कलर्स अवार्ड समारंभामध्ये त्यांना योग्य तो सन्मान मिळावा यासाठी व इतर प्रश्नांसंदर्भात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चे क्रिडा विभाग संचालक मा डॉ पी.टी गायकवाड सर यांना राष्ट्रवादी शहरजिल्हाध्यक्ष शुभम जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले 
                     खेलो इंडिया मध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करून पदक प्राप्त केलेल्या खेळाडूंना विद्यापीठाच्या क्रीडा विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या कलर्स अवार्ड समारंभात समाविष्ट करून  योग्य तो सन्मान दिला जावा , त्यांच्या वर अन्याय होऊ नये ,विद्यापीठाचे नाव उंचावण्यात सदर खेळाडूंचे मोलाचे योगदान लक्षात घेऊन त्यांचा सन्मान करावा असे शहरजिल्हाध्यक्ष शुभम जाधव यांनी निवेदनात म्हंटले आहे , या विषयावर व इतर प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली आहे क्रीडा विभागाचे प्रमुख मा डॉ. पी टी.गायकवाड  यांनी या संदर्भात आम्ही केलेल्या मागण्या लवकरच  मान्य होतील असे आश्वासन दिले असल्याचे शहरजिल्हाध्यक्ष शुभम जाधव यांनी सांगितले .
        यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष( व्यवस्थापन विभाग) मा .अनुपजी करांडे उपस्थित होते.

Share

Other News