ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*भगूरच्या गरजू लोकांसाठी जीवनदान ठरती आहे मोफत शिवभोजन थाळी* प्रेरणा बलकवडे


  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 4/20/2021 6:40:57 AM


*भगूरच्या  गरजू लोकांसाठी जीवनदान ठरती आहे मोफत शिवभोजन थाळी* प्रेरणा बलकवडे

*महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री *मा. उद्धव ठाकरे जी व अन्न पुरवठा मंत्री व नाशिकचे पालक मंत्री आदरणिय भुजबळ साहेब* यांच्या आशिर्वादाने भगूरच्या जनतेसाठी शिवभोजन केंद्र गेल्या एक वर्षा पासून सेवा देत आहे. 
*झेप फाऊंडेशनच्या* माध्यमातून हे केंद्र गरजूंना लाभ पोचवत आहे. सरकार आल्यावर 10 रु. प्रति शिवभोजन सुरु केले. कोविड आल्यावर रु. 5 प्रति थाळी केली होती. आता पुढचा एक महिना शिवभोजनथाळी  मोफत चालु आहे. तरी भगुरच्या नागरिकांना विनंती आहे की या सेवेचा लाभ घ्यावा असे झेप फाऊंडेशनच्या व राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी सांगितले 
 संचारबंदीच्या काळात हाताला काम नसलेला एक मोठा वर्ग आहे अशा  गरजू कुटुंबासाठी शिवभोजन थाळी उपयोगी पडत आहे. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, मजुर, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांच्या रोजच्या जेवणाची सोय या माध्यमातून उपलब्ध झाली असल्याने समाधान आहे.

Share

Other News