ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंतच खुली राहणार!; लवकरच नव्या गाइडलाइन्स


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 4/20/2021 10:22:40 AM

मुंबई :- 

          राज्यात करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी आणि निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून या अनुषंगाने आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

         संचारबंदी असतानाही किराणा सामान खरेदी करण्याच्या नावाखाली लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच किराणा दुकाने सुरू ठेवण्यासाठी सकाळी ७ ते ११ अशी चार तासांचीच वेळ देण्याचा विचार सुरू आहे. आज झालेल्या आढावा बैठकीत याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तशी भूमिका मांडली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संमतीने तसे बदल केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. हा निर्णय जिल्हा पातळीवर न सोडता राज्यासाठी ज्या गाइडलाइन्स निश्चित करण्यात आल्या आहेत त्यात हा बदल केला जावा, असे आम्हाला वाटते, असेही टोपे यांनी पुढे नमूद केले.


 
देवेंद्र देविकार (विदर्भ प्रमुख संपादक)
7588888787

Share

Other News