भाऊप्रेमी कार्यकर्त्याना ताकत व आधार देण्यासाठी जयश्रीताई वहिनी मैदानात...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 24/04/2024 10:39 AM

*मदनभाऊच्या आठवणीत तळमळणाऱ्या भाऊप्रेमी कार्यकर्त्यांना ताकत व आधार देण्यासाठी जयश्री वहिनी मैदानात* 

ज्या स्वर्गीय मदनभाऊ यानी दादा घरण्याच्या सन्मानासाठी आणि कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानासाठी नेहमी आवाज उठवला त्यांच्या पश्चात त्यांचा विचार खंबीरपणे खांद्यावर घेऊन जयश्री वहिनी मैदानात उतरल्या आहेत.

आमचा आदर्श व अभिमान असलेल्या स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्यानंतर ज्यांच्यासाठी जीव ओतून काम करावे अश्या मातृतुल्य नेत्या श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील वहिनीसाहेब यांनी स्वर्गीय मदनभाऊ यांनी ज्या पद्धतीने दादाघराणे व त्या घरातील एक महत्त्वाचे घटक आहोत म्हणून वाद-विवादाला फाटा देऊन सगळे सुखदुःख पचवून काम केले,त्याच पद्धतीने दादा घराण्याच्या विरोधात षडयंत्र रचून कायमस्वरूपी काटा काढण्याचे काम करणाऱ्या प्रवृत्तीला गाढण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. सांगलीत विकृत राजकारणाला व दादा घरण्याच्या विरोधात कट रचणाऱ्या प्रवृतीना
येथून पुढे थारा न देता त्या प्रवृत्तीचे विरोध लढण्याच धाडस मदन भाऊ यानी केली त्याची आठवण जयश्री वहिनी पावलो पावली करुन देत आहेत.मदनभाऊ यानी जी उमेद व ताकद ज्या पद्धतीने दिलेली आहे आणि स्वतः दादा घराण्याचा लोकसभेतील दावा सांगण्यासाठी आपला दिराच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून विशालदादा याना निवडून आणायचे पालकत्व स्विकारून काम सुरू केले आहे.त्याचा आम्हा समस्त सांगली जिल्ह्यातील वसंतदादा व मदनभाऊ प्रेमी कार्यकर्त्यांना अभिमानच वाटत असून कार्यकर्ते वहिनीच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले दिसत असल्याचे चित्र आहे.

आज जयश्रीवहिनी मदनभाऊ यांच्या पश्चात निर्माण झालेली पोकळी भरून काढायचा  प्रयत्न जोरदारपणे करत आहेत.स्व.मदनभाऊ यानी कार्यकर्त्यांच्यावर जे प्रेम केले त्यामधून उतराई होण्याची संधी आज सर्व मदनभाऊ प्रेमी कार्यकर्त्यांना आली आहे.आज ज्या जयश्री वहिनी माऊली बनून सदैव पाठीशी उभा राहिल्या त्याना साथ देण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची असून निरोपाची वाट न पाहता आपला जबाबदारीचा लिफाफा घेऊन घराघरात पोचून त्याना साथ देऊया अशी भावना ज्याना मदनभाऊ यानी राजकीय संधी दिली असे सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्यात आहे. महानगरपालिका क्षेत्रात जयश्रीवहिनी यांच्या आवहानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देताना दिसत आहेत काही जण उघडपणे तर पक्षीय अडचणी असणारे छुपया पद्धतीने मदत करत असल्याचे चित्र आहे.

*ज्यानी दिला तिकीट मिळवताना धोका,*
*त्यांच्या इर्षवर निवडून आणणार लिफाफा*
असा काहीसा माहोल वसंतदादा व मदनभाऊ प्रेमी यांच्या कडून तयार केला जात आहे.

दूसरीकडे अशाच पद्धतीने संजयकाका यांच्या सुविद्य पत्नी ज्योतीताई,विशालदादा यांच्या पत्नी पूजाताई,पै चंद्रहार यांच्या पत्नी दिव्याताई ही सर्व नारी शक्ती खासदारकीच्या मैदानात रणरागिनी बनून उतरल्या आहेत.

सतिश साखळकर
नागरिक जागृती मंच,सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या