असा प्रयोग आपल्याकडे करायला हरकत नसावी...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/04/2024 7:51 PM

डासांचा प्रादुर्भाव हा देशभरात सर्व ठिकाणी आहे 
ऑइल बॉल तयार करून ते साठलेल्या पाण्यात टाकल्यामुळे डासांची पैदास कमी होते असे ह्या फोटोतून दिसत आहे.
आपल्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मध्ये गेल्या दोन-तीन वर्षापासून साठलेल्या पाण्यात आपण डायरेक्ट ऑइल टाकत होतो वरील प्रमाणे ऑइल बॉल तयार करून मनपा क्षेत्रात असा प्रयोग करायला काही हरकत नसावी त्याच पद्धतीने ग्रामीण भागात सुद्धा असा प्रयोग करावा.
सांगली मिरज आणि कुपवाड चे महानगरपालिकेचे माननीय आयुक्त असतील किंवा सांगली जिल्हा परिषदेच्या सीईओ असतील यांनी ह्या बाबतीत विचार करावा अशी विनंती आहे.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या