तिरूपती बालाजीचे दर्शन घेऊन येणाऱ्या भगूर येथील भाविकांच्या इनोव्हा गाडीचा अपघात 

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 22/07/2022 9:49 PM

तिरूपती बालाजीचे दर्शन घेऊन येणाऱ्या भगूर येथील भाविकांच्या इनोव्हा गाडीचा अपघात 


 तिरूपती बालाजीचे दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांच्या इनोव्हा गाडीचा अपघात होऊन दोन ठार तर सहा जण जखमी झाले.अपघातात म्रुत्यू झालेले दोघेही मित्र भगूर व नानेगाव चे असल्याने गावांवर शोककळा पसरली आहे. १८जुलै सोमवारी रोजी विजयनगर येथून तिरूपती बालाजी च्या दर्शनासाठी मित्र दोन इनोव्हा गाड्या घेऊन गेले होते.आज सकाळी पाच वाजेच्या दरम्यान कर्नाटकमधील दावनगिरी जवळ इनोव्हा गाडीने चार ते पाच वेळेस पलटी झाल्याने गाडीतील विजय कोरडे(रा.भगूर) ,निलेश आडके(रा.नानेगाव) यांचा जागीच म्रुत्यू झाला तर गाडीतील महेश अशोक गिते,प्रवीण साळवे,दीपक धात्रक,ऋतिक केदार,सचिन आव्हाड,आकाश सातपुते हे जखमी झाले अपघातानंतर इनोव्हा गाडी बेंगलोर हायवे सोडून बाजूच्या शेतातील कच्च्या रस्त्यावर जाऊन पडली होती.अपघातानंतर एका जखमीने दुसऱ्या गाडीतील मित्रांना गाडीचा अपघात झाल्याची माहिती दिली यामुळे पुढे गेलेली दुसरी इनोव्हा गाडी परत मागे येऊन गाडीचा शोध घेऊन गाडीतील जखमींना बाहेर काढून पोलीसांना अपघाताची माहिती दिली. घटनास्थळी पोलीसांनी मदत केल्याने जखमींवर उपचार होऊ शकले.

Share

Other News

ताज्या बातम्या