रेशन दुकानात वाटप केल्या जाणाऱ्या भेसळयुक तांदूळ पंचनामा करून साठा परत मागवण्याची मागणी..

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/04/2024 5:28 PM

प्रति
मा पुरवठा अधिकारी,
सांगली जिल्हा.

विषय : रेशन दुकानात वाटप केल्या जाणाऱ्या प्लास्टीक...? भेसळयुक्त तांदळाचा पंचनामा करून भेसलयुक्त तांदूळ साठा परत मागवणेबाबत,

महोदय,
नागरिक जागृती मंचकडे अनेक नागरिक रेशन मधील प्लास्टीक....? तांदूळ वाटप केले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत.निवडणूक काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा प्रकार निंदनीय असून दोषी वर कडक कारवाई होणे आवश्यक आहे.आमची आपणास विनंती आहे की आपण जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानात असलेल्या तांदूळ साठयाचा पंचनामा करुण तांदळाची तपासणी करावी.याशिवाय जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानातील सर्व भेसळयुक्त तांदूळ साठा परत घेऊन लहान मुले,गर्भवती स्त्रिया,व्यस्कर नागरिक यांच्या जीवाशी चालवलेला खेळ थांबवावा ही नम्र विनंती.
तसेच सदर प्रकार नेमका काय आहे त्याचा सांगली जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी खुलासा करावा अशी विनंती आहे.

कळावे,
आपला विश्वासू.

सतिश साखळकर...

Share

Other News

ताज्या बातम्या