महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील व चंदनदादा चव्हाण यांचा आगळगारगाव येथे प्रचार दौरा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/04/2024 11:08 PM

आज मंगळवार दि. २३/४/२०२४ रोजी, सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, उध्दवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील दादा यांनी आगळगांव येथे आज भेट दिली, तसेच गुंठेवारी चळवळीचे जनक प्रदेशाध्यक्ष मा. चंदनदादा चव्हाण यांनीही आगळगांव येथे भेट दिली, यावेळी मा. चंदनदादा चव्हाण यांनी श्री. जोतिबा मंदिर आगळगांव येथे दर्शन घेतले, प्रदेशाध्यक्ष मा. चंदनदादा चव्हाण यांचे आगळगांव हे अजोळ असून त्यांनी बऱ्याच ठिकाणी भेटी दिल्या, यावेळी शिवसेना गुंठेवारी विकास समिती कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष मा. रामदास सावंत, उपाध्यक्ष मा. पैलवान भारत गावडे, श्री. गणेश चव्हाण, कुपवाड शहर अध्यक्ष मा. बापूसाहेब देशमुख, अक्षय पवार उपस्थित होते,
शिवसेना गुंठेवारी विकास समिती कवठेमहांकाळ तालुका

Share

Other News

ताज्या बातम्या